---Advertisement---

नाद केला पण वाया नाय गेला! टीम इंडियाने मोडला दिग्गज ॲास्ट्रेलियाचा मोठा विक्रम!

On: रविवार, मार्च 9, 2025 3:21 PM
---Advertisement---

आज (9 मार्च) आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील फायनल सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगला आहे. दरम्यान भारत आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने आहेत. (India vs New Zealand Final) यादरम्यान भारताने मैदानात उतरताच ऑस्ट्रेलियाचा मोठा विक्रम मोडला आहे. भारत सर्वाधिक आयसीसी फायनल खेळणारा संघ पहिला संघ ठरला आहे. (Most ICC Finals)

भारतीय संघाने आतापर्यंत तब्बल 14 वेळा आयसीसीच्या फायनल सामन्यात प्रवेश केला आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया 13 वेळा फायनलमध्ये पोहोचून दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड 9 वेळा, वेस्ट इंडिज 8 वेळा, न्यूझीलंड आणि श्रीलंका प्रत्येकी 7 वेळा, पाकिस्तान 6 वेळा तर दक्षिण आफ्रिका 2 वेळा फायनल सामन्यात पोहोचले आहेत.

भारतीय संघाने यापूर्वी 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आता पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी भारतीय संघाला मिळाली आहे. यापूर्वी 2000 मध्ये न्यूझीलंडकडून आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता भारतीय संघाला तब्बल 25 वर्षांनंतर बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे.

सर्वाधिक आयसीसी फायनल खेळणारे संघ-
भारत- 14
ऑस्ट्रेलिया- 13
इंग्लंड- 9
वेस्ट इंडिज- 8
न्यूझीलंड- 7
श्रीलंका- 7
पाकिस्तान- 6
दक्षिण आफ्रिका- 2

महत्त्वाच्या बातम्या-

अक्षर पटेलच्या खेळाने पालक खुश, चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलसाठी उत्साह ताणला!
टॅास हारणं टीम इंडियाला किती महागात पडणार? पहा काय सांगतोय पीच रिपोर्ट?
रोहित शर्मा निवृत्ती घेणार? सौरव गांगुलींच्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---