भारत आणि बांगलादेश या संघात एकदिवसीय मालिकेचा तिसरा सामना चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. भारतीय संघ या मैदानावर पहिल्यांदा खेळतोय. या आधी 2007मध्ये या मैदानावर खेळण्याचा मुहुर्त ठरला होता. मात्र, पावसाच्या वत्ययामुळे एकही चेंडू न फेकता सामना रद्द करण्यात आला होता. आता जेव्हा भारतीय संघ एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा असे काहीतरी घडले जे भारताच्या क्रिकेटच्या इतिहासात 11 वर्षांनी बघायला मिळाले.
11 वर्षांआधी जेव्हा ही घटना घडली तेव्हा मैदान वेस्ट इंडिजचे होतेे आणि आता 11 वर्षांनंतर मैदान बांगलादेशचे आहे. दोन्ही ठिकाणी एकच साम्य बघायला मिळते, ते म्हणजे शिखर धवन आणि ती घटना होती भारताच्या क्रिकेट इतिहासात दोनही सलामीवीर डावखुरे खेळवण्याची. 11 वर्षांआधी भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध दोन्ही सलामीवीर डावखुरे उतरवले होते.
11 वर्षांनी पुनरावृत्ती
बांगलादेश विरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि ईशान किशन (Ishan Kishan) मैदानात उतरले. भारताच्या एकदिवसीय क्रिकेट इतिहासात डावखुरे सलामीवीर दुसऱ्यांदा बघायला मिळाले. याआधी शेवटच्या वेळी अशी घटना 11 वर्षांआधी जून 2011मध्ये घडली होती. किंग्सटन येथे भारत विरुद्ध वेस्ट इंंडिज या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाच्या डावाची सुरुवात शिखर धवन आणि पार्थिव पटेल (Parthiv Patel) यांनी केली होती.
15 धावांवर तुटली भागीदारी
भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या ऐवजी ईशान किशन याला संघात स्थान देण्यात आले आणि अपेक्षेप्रमाणे किशनला रोहितच्या जागी सलामीला उतरवण्यात आले. शिखर धवन आणि ईशान किशन या जोडीने पहिल्या विकेटसाठी 15 धावांची भागीदारी केली. शिखर धवनने 8 चेंडूत 3 धावा करत बाद झाला.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. धवन स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना चांगलेच धुतले. 34 षटकात भारताची धावसंख्या 35 षटकात 1 बाद 295 इतकी झाली. भारताच्या ईशान किशनने 126 चेंडूत 200 धावा केल्या आणि विराट कोहली (Virat Kohli) याने 76 चेंडूत 84 धावा केल्या.(India has repeated the history of starting with two southpaws in third ODI verses Bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वविक्रमवीर ईशान किशन! तिसऱ्या वनडेत ठोकले वादळी द्विशतक
‘त्या’ जाहिरातीमुळे रिषभ पंतवर प्रसिद्ध गायिकेची आगपाखड; म्हणाल्या, ‘तू मूर्खासारखा दिसतोस’