India vs England Test Series: इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी इंग्लंड संघाला इशारा दिला आहे की, त्यांच्याकडे ‘बेसबॉल’ खेळ असेल तर भारताकडे ‘विराटबॉल’ आहे. गावस्कर यांच्या मते, इंग्लंडचा आक्रमणाचा दृष्टिकोन भारतीय फिरकीपटूंविरुद्ध काम करतो की, नाही हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये तर दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणममध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघाला या मालिकेत मोठा विजय मिळवायचा आहे, जेणेकरून त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी आपला दावा मजबूत करता येईल.
इंग्लंड संघ बॅझबॉल म्हणून ओळखल्या जाणार्या कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक दृष्टिकोनासाठी ओळखला जातो. मात्र, भारतीय खेळपट्ट्यांवर त्यांना मोठे आव्हान पेलावे लागू शकते. भारतीय संघाचे माजी सलामीवीर सुनील गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सांगितले की, “इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’चा मुकाबला करण्यासाठी भारताकडे ‘विराटबॉल’ आहे. गेल्या 1-2 वर्षात इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये नवा दृष्टिकोन स्वीकारला आहे आणि ते आक्रमक क्रिकेट खेळतात. परिस्थिती कशीही असली तरी संघ अतिशय आक्रमकपणे खेळतो. आता त्यांचा दृष्टिकोन भारतातील फिरकीपटूंविरुद्ध कामी येतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.”
याआधी सुनील गावस्कर यांनी भारतीय संघाच्या फलंदाजांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला होता. ते म्हणाले होते की, अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेत खेळण्याऐवजी भारतीय फलंदाज सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळले असते तर त्यांची तयारी अधिक चांगली झाली असती. गावसकर यांच्या मते, दक्षिण आफ्रिकेत भारताचे बहुतांश फलंदाज फ्लॉप झाले होते आणि त्यामुळेच रणजीमध्ये खेळून त्यांची तयारी मजबूत करणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. (India has Viratball the Indian legend’s big warning to the England team ahead of the Test series)
हेही वाचा
IND vs ENG: जडेजा मुरलीधरन किंवा शेन वॉर्न नाही, पीटरसनने भारतीय फिरकीपटूचा सामना करण्यासाठी इंग्लंडला दिला मंत्र
IND vs ENG: माजी भारतीय खेळाडूचा रोहितला सल्ला, सांगितलं इंग्लंडविरुद्ध काय करायला हवं