सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ५ टी२० सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या मलिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने भारतावर ७ गडी राखत मात केली. त्यानंतर भारतीय संघावर अनेकांनी टीकी केली. मात्र, आता रविवार (१२ जून) रोजी होणाऱ्या सामन्यांत भारताला दक्षिण आफ्रिकेला हरवत ६ वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकविरुद्ध २०१५ साली झालेल्या टी२० मालिकेतील एक सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर झाला होता. हा सामना ऑक्टोबर २०१५ मध्ये झाला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. त्याचा बदला घेण्याची भारतीय संघाला संधी असेल. त्या सामन्यांत सध्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या संघातील डेव्हिड मिलर आणि वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांचा समावेश होता. तर, भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेल या दोघांनी त्या सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.
याआधी बाराबती स्टेडियमवर झालेले सामने
कटकमधील बाराबती स्टेडियमवर आतापर्यंत फक्त २ टी२० सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. एका सामन्यात भारताने १८० धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यांत पहिल्या डावाची एकूण सरासरी १३६ आहे तर दुसऱ्या डावाची सरासरी एकूण ९१ आहे. कटकमधील खेळपट्टी अनेकदा अपेक्षित बाउन्स देते आणि त्यामुळे स्पिनर आणि वेगवान गोलंदाज दोघांनाही मदत होते. शिवाय गेल्या दोन सामन्यांचे विश्लेषण केल्यास कटकमधील खेळपट्टी ही गोलंदाजांसाठी अनुकुल असल्याचे समजून येईल. त्यामुळे दुसऱ्या टी२० सामन्यांत फलंदाजांपेक्षा गोलंदाजांवर विशेष भर राहणार आहे.
दुसऱ्या टी२० सामन्यात कर्णधार पंतची अग्नपरीक्षा
मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलेल्या केएल राहुलला दुखापत झाली, आणि त्याला मालिकेतून बाहेर पडावे लागले. त्यानंतर अचानकपणे कर्णधारपदाची जबाबदारी रिषभ पंतकडे सोपावण्यात आली. कर्णधार पदाची जबाबदारी दिल्यानंतर पंतला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. डेव्हिड मिलर आणि रुसी व्हॅन डर ड्युसेन यांनी २१२ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना कोणताही त्रास न होता आपल्या संघाला मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यांत भारतीय संघावर आणि खासकरून कर्णधार रिषभ पंतवर अधिकचा दबाव असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘शतकवीर’ टॉम ब्लंडेलने इंग्लंडच्या मैदानावर रचला इतिहास, विरोधी संघाच्या प्रशिक्षकाचाच मोडला रेकॉर्ड
Third T20I: दसुन शनाकाची कर्णधार खेळी, श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्सने चितपट करत राखली लाज
भारतावर परमाणू बॉम्ब टाकण्याची धमकी देणारा पाकिस्तानी क्रिकेटर, ठोकलीत ३१ शतके