भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. आता दुसरा टी20 सामना दिल्लीच्या अरूण जेटली मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारताने बांगलादेविरूद्ध तुफानी फलंदाजी केली. तत्पूर्वी या बातमीद्वारे भारताने कोणता नवा रेकाॅर्ड केला हे जाणून घेऊया.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक शैलीत फलंदाजी केली. या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर भारताने बांगलादेशविरुद्ध टी20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकाॅर्ड केला आहे. दिल्लीच्या मैदानावर भारताने एका डावात एकूण 15 षटकार ठोकले. जे बांगलादेशविरुद्ध कोणत्याही संघाकडून सर्वाधिक षटकार मारले आहेत.
वेस्ट इंडिजने (West Indies) 2012 मध्ये मीरपूरच्या मैदानावर झालेल्या टी20 सामन्यात बांगलादेशविरुद्ध 14 षटकार ठोकले होते, मात्र आता भारताने त्यांचा रेकाॅर्ड मोडीत काढला. पण आधी देखील भारताने यंदाच्या वर्षीच नॉर्थ साउंडच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध भारतीय फलंदाजांनी 13 षटकार ठोकले होते.
बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे संघ- भारत-15 दिल्ली 2024, वेस्ट इंडिज-14, मीरपूर 2012, भारत-13, नॉर्थ साउंड 2024
भारतीय डावात सर्वाधिक षटकार नितीश रेड्डीच्या (Nitish Reddy) बॅटमधून आले. या युवा खेळाडूने एक फलंदाज म्हणून विस्फोटक 74 धावांची विस्फोटक खेळी केली. त्याने 34 चेंडूत 4 चौकारांसह 7 षटकार ठोकले. रिंकू सिंहनेही 3 षटकार ठोकले. हार्दिक पांड्या आणि रिंयान परागने प्रत्येकी 2 षटकार तर अर्शदीप सिंगने 1 षटकार ठोकला. फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने बांगलादेशला विजयासाठी 222 धावांचे कठीण लक्ष्य दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN; भारताला मिळाला नवा खतरनाक फलंदाज! ठोकले तुफानी अर्धशतक
IND vs BAN; दुसऱ्या टी20 सामन्यात संजू सॅमसन फ्लाॅप! सोशल मीडियावर चाहत्यांचा हल्लाबोल
पाकिस्तानात होणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफी? आयसीसीचा नवा प्लॅन जाणून घ्या