ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा उपस्थित नव्हता. दुसऱ्या वनडे सामन्यासाठी रोहित उपस्थित राहिला, पण त्याच्या नेतृत्वात संघाचे प्रदर्शन मात्र खूपच निराशाजनक झाले. मायदेशातील वनडे सामन्यात भारतीय संघ अवघ्या 117 धावांवर सर्वबाद झाल्याने चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. मागच्या 30 वर्षांमध्ये ही फक्त दुसरीच वेळ आहे, जेव्हा भारतीय संघ मायदेशातील वनडे सामन्यात 120 पेक्षा कमी धावसंख्येवर सर्वबाद झाला आहे.
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या वनडे सामन्यात खेळत नसल्याने कर्णधारपद हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्याकडे होते. हार्दिकच्या नेतृत्वात भारताने हातातून निसटलेला पहिला वनडे सामनाक कसाबसला जिंकला. पण दुसऱ्या वनडेत संघाची अवस्थात पहिल्या वनडेपेक्षाकी बिकट झाली. मागच्या तीन वर्षांमध्ये भारतीय संघ मायदेशातील वनडे सामन्यात फक्त दोन वेळा 120 धावांच्या आतमध्ये सर्वबाद झाला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही सामन्यांमध्ये कर्णधाराची भूमिका दुसरा कोणी नाही, तर स्वतः रोहित शर्माच बजावत होता. अशात रोहितसाठी हा एक नकोसा विक्रम म्हणता येईल.
रविवारी (19 मार्च) खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियन दिग्गज मिचेल स्टार्क याने पाच विकेट्सचा हॉल घेतला. परिणामी भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 117 धावांवर बात झाला. याआधी भारताने अशी नकोसी कामगिरी 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात केली होती. अवघ्या 112 धावा करून रोहितच्या नेतृत्तवातील भारतीय संघ सर्वबाद झाला होता. सुरंगा लकमल याने या सामन्यात भारताचा सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या आणि सामनावीर पुरस्कारही नावावर केला होता.
मागच्या 30 वर्षीत मायदेशातील वनडे सामन्यात 120 धावांच्या आतमध्ये भारतीय संघ सर्वबाद
भारत विरुद्ध श्रीलंका (2017)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2023)
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा दुसरा वनडे सामना विशाखापट्टणममध्ये खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. परिणामी संघ स्वस्तात बाद झाला. दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 8 षटकांमध्ये 53 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तसेच वेगवान गोलंदाज शॉन ऍबॉट याने 6 षटकात 23 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. फिरकीपटू नाथन एलिसने 2 विकेट्स घेतल्या, ज्यासाठी त्याने 5 षटकांमध्ये 13 धावा दिल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्टार्कच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांची दाणादाण! टीम इंडिया 117 धावांवर ऑलआउट
स्मिथने चित्त्याच्या चपळाईने घेतला कॅच, ऑस्ट्रेलियन कर्णधाराची लवचिकता पाहून रोहित अवाक