कित्येक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज (१७ डिसेंबर) तो दिवस उजाडला आहे. आजपासून ऍडलेडच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी ठरलेल्या नियमानुसार नाणेफेक झाली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अशात नाणेफेकीसह विराटने सामनाही जिंकल्याची चर्चा रंगू लागली आहे.
पाहा काय सांगते आकडेवारी
आपणा सर्वांना माहिती आहे की, गेल्या कित्येक वर्षांपासून विराट भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व करत आहे. गणिती आकडेवारीनुसार आतापर्यंत विराटने २५ कसोटी सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली आहे. त्यातील २१ सामन्यात भारताने विजयी पताका झळकावली आहे, तर ४ सामने अनिर्णित राहिले आहे. म्हणजे, नाणेफेक जिंकल्यानंतर विराटने आतापर्यंत एकदाही सामना गमावलेला नाही. त्यामुळे नाणेफेकीसह विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामनाही जिंकल्याची चर्चा रंगली आहे.
Good News for India. India have never lost a Test when Virat Kohli has won the toss.
Played 25, Won 21 and Drawn 4 #AUSvsIND
— ESPNcricinfo stats (@ESPNcric_stats) December 17, 2020
पहिल्या कसोटी सामन्याविषयी थोडेसे
ऍडलेडच्या ऍडलेड ऑव्हल स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ पहिला कसोटी सामना खेळणार आहेत. प्रकाशझोतात गुलाबी चेंडूने खेळण्यात येणारा हा दिवसरात्र सामना २१ डिसेंबरला संपेल. भारतीय संघाकडून युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि मयंक अगरवाल सलामीला फलंदाजी करतील, तर ऑस्ट्रेलियाच्या अंतिम ११ जणांच्या पथकात कॅमरॉन ग्रीनला जागा मिळाली आहे. त्यामुळे ग्रीन भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करेल. शिवाय भारताचा कर्णधार विराटचा हा मालिकेतील एकमेव सामना असेल. या सामन्यानंतर तो पालकत्त्व रजेमुळे मायदेशात परतेल.
महत्त्वाच्या बातम्या-
विक्रमवीर विराट! पहिल्या कसोटीत तेंडुलकर व लाराचे ‘हे’ २ विक्रम करू शकतो आपल्या नावावर






