अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 6 डिसेंबर पासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना सध्या अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे.
या सामन्यात चौथ्या दिवसाखेर (9 डिसेंबर) आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 49 षटकात 4 बाद 104 धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी अजूनही 219 धावांची आवश्यकता आहे. तर भारताला विजयासाठी 6 विकेट्सची गरज आहे.
त्यामुळे जर भारताने या सामन्यात विजय मिळवला तर पहिल्यांदाच भारतीय संघ आॅस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवण्याचा पराक्रम करेल. सध्या सुरु असलेली कसोटी मालिका ही भारताची आॅस्ट्रेलियामधील 12 वी कसोटी मालिका आहे.
याआधी झालेल्या 11 कसोटी मालिकेत एकदाही भारताला पहिला कसोटी सामना जिंकता आलेला नाही. या 11 कसोटी मालिकेत 9 वेळा भारताने पहिला कसोटी सामन्यात पराभव स्विकारला आहे, तर दोन वेळा पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे.
त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच आॅस्ट्रेलियन भूमीत आॅस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे.
तसेच हा सामना जिंकल्यास विराट कोहलीला इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलियामध्ये कसोटी विजय मिळवणारा पहिला आशियाई कर्णधार होण्याची संधी आहे.
त्याचबरोबर जर भारताने हा सामना जिंकला तर एका कॅलेंडर वर्षात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकणारा भारत पहिला आशियाई संघ ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या:
–असा आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिकेचा इतिहास…
–Video: आॅस्ट्रेलियन चाहत्यांकडून आपमान झाल्यानंतरही विराट कोहलीने दाखवली खिलाडूवृत्ती
–Video: आॅस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा आऊट होणार हे या दिग्गजाने आधीच ओळखलं!
–गौतम गंभीरची ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीवर कठोर शब्दात टीका