---Advertisement---

“हे भारताचे मागील २० वर्षातील सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण”

On: बुधवार, जून 9, 2021 1:50 PM
---Advertisement---

कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आणखी ९ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. भारत आणि न्यूझीलंड या ऐतिहासिक आणि बहुप्रतिक्षित सामन्यात एकमेकांशी दोन हात करतील. एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर हा सामना रंगणार आहे. तत्पूर्वी, न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम याने भारतीय संघाचे तोंडभरून कौतुक केले.

दोन्ही संघ ताकदवान
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात आक्रमक फलंदाजांपैकी एक असलेला व न्यूझीलंडला प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेणारा कर्णधार अशी ओळख असलेला ब्रेंडन मॅक्युलम याने एका क्रीडासंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीविषयी आपली मते मांडली.

यादरम्यान त्याने भारतीय संघाचे कौतुक केले. मॅक्युलम म्हणाला, “जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी भिडणारे दोन्ही संघ कमालीचे मजबूत आहेत. उभय संघ अंतिम सामन्यात आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन उतरतील. सामना इंग्लंडमध्ये खेळला जाणार असल्याने, सर्वांचे लक्ष दोन्ही संघाच्या वेगवान गोलंदाजांवर असेल.”

इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर नेहमीच वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळते.

हे भारताचे सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण
मॅकलम यांनी भारतीय गोलंदाजांचे कौतुक करताना म्हटले, “भारताकडे यापूर्वी अगदी काहीच अप्रतिम वेगवान गोलंदाज होऊन गेले. यामध्ये कपिल देव, जवागल श्रीनाथ व झहीर खान यांचा उल्लेख करावा लागेल. मात्र, मला विचाराल तर सध्याचे भारतीय गोलंदाजी आक्रमण मागील वीस वर्षातील सर्वोत्तम आहे. दर्जेदार वेगवान गोलंदाजांच्या जोडीला रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा ही अनुभवी फिरकी जोडीदेखील असेल. हे गोलंदाज जगात कोठेही उल्लेखनीय कामगिरी करू शकतात.”

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी घोषित झालेल्या भारतीय संघात १०० कसोटी सामने खेळणारा इशांत शर्मा, सध्या जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी मानले जाणारे जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी, अनुभवी उमेश यादव तसेच युवा मोहम्मद सिराज व शार्दुल ठाकूर या वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

कलम ३७० चा भारतीय वाहिन्यांना बसणार आर्थिक फटका? क्रिकेट प्रक्षेपणासाठी भारतीय कंपन्यांना दिला नकार

इंग्लंडसाठी सर्वात मोठा विक्रम करण्यापूर्वी अँडरसन झाला भावूक; म्हणाला, ‘वाटले नव्हते की मी या शिखरावर पोहोचेल’

कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलचा उत्साह शिगेला! ‘हा’ माजी क्रिकेटर म्हणतोय न्यूझीलंड ६ विकेट्सने जिंकेल सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---