तिरुअनंतपुरम। भारत विरुद्ध न्यूझीलँड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना भारताने ६ धावांनी जिंकत टी२० मालिका २-१ अशी जिंकली. केवळ ८ षटकांचा सामना असूनही या सामन्यात अनेक विक्रम झाले. ते असे-
– ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत धावांचा पाठलाग करणारा संघ सर्व सामने पराभूत झालेली केवळ दुसरी मालिका. यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड २०१२
-विराट कोहलीने खेळाडू म्हणून भारताकडून १८६ वा सामना जिंकत हरभजन सिंग(१८५) आणि सौरव गांगुली(१८४)चा विक्रम मोडला. सचिन(३०७), धोनी(२५६), युवराज(२२७) आणि द्रविड(२१६) यादीत अव्वल.
-सर्वात कमी धावा करूनही संघाने जिंकायची तिसरी वेळ. यापूर्वी आयर्लंड-बर्मुडा (४६धावा) आणि नेदरलँड-आयर्लंड(६०) हे कमी धावसंख्येचे सामने झाले.
-भारताच्या ६ फलंदाजांनी कमीतकमी ६ चेंडू खेळले परंतु एकालाही ११ पेक्षा जास्त चेंडू खेळता आले नाही.
-धोनीच्या संपूर्ण कारकिर्दीत तो पहिल्यांदाच एकही चेंडू न खेळता एकही धाव न करता नाबाद राहिला.
-भारतातील हे ५०वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान होते. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड देश असून त्या देशात २३ मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत.
-न्यूझीलँड संघाचा हा १००वा आंतरराष्ट्रीय सामना होता. यापूर्वी केवळ पाकिस्तान (१२०) आणि दक्षिण आफ्रिका (१००) हे संघ १०० पेक्षा जास्त सामने खेळले आहेत.
-कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत कोणतीही द्विपक्षीय मालिका पराभूत झाला नाही. (कमीतकमी २ सामने असलेली मालिका )
-माजी कर्णधार एमएस धोनीचा हा ८३वा सामना होता. यापूर्वी केवळ शाहिद आफ्रिदी (९८) आणि शोएब मलिक (९२) हे धोनीपेक्षा जास्त सामने खेळले आहेत.