विराट कोहलीसाठी इंग्लंड दौऱ्यात चांगली फलंदाजी करणे गरजेच असल्याच मत व्यक्त केलं आहे आॅस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्राॅने.
“सगळे दौरे हे महत्त्वाचे असतात. विराट सगळ्या देशात चांगले खेळला आहे. परंतु त्याला मनासारखी कामगिरी इंग्लंडमध्ये करता आली नाही. ही गोष्ट बदल्यासाठी तो नक्की प्रयत्न करणार आहे.” असे मॅकग्राॅ म्हणाला.
“विराट एक मोठा खेळाडू आहे. तो निर्भीड योद्धा आहे. तो इतरांपेक्षा वेगळा आहे. त्याला या दौऱ्यात धावा करुन स्वत:ला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे. इंग्लंडमध्ये खेळणे नक्कीच कठीण आहे. अनेक खेळाडू येथे अडखळतात. परंतु तुम्ही याचा चांगला अभ्यास केला तर तुम्ही नक्की यशस्वी होता. विराटला हे नीट समजले तर तो नक्कीच धावा करेल.” असेही हा दिग्गज पुढे म्हणाला.
ग्लेन मॅकग्राॅची कारकिर्द-
४८ वर्षीय मॅकग्राॅ आॅस्ट्रेलियाकडून १२४ कसोटी सामने खेळला असून त्यात त्याने २१.६४च्या सरासरीने ५६३ विकेट्स घेतल्या आहेत. केवळ ३० कसोटी सामन्यात मॅकग्राॅने इंग्लंडविरुद्ध २०.९२च्या सरासरीने १५७ विकेट्स घेतल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–लाॅर्ड्सवर गांगुलीने या खेळाडूला दिला होता टी-शर्ट काढण्याचा सल्ला
–कोहलीवर टीका करण्यापूर्वी तुझे संघातील स्थान पहा, इंग्लंडच्या गोलंदाजावर झहीर कडाडला!
–इम्रान खानबद्दल तब्बल ६वर्षांपूर्वी केलेली गावसकरांची भविष्यवाणी अखेर खरी ठरली