आयपीएल जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी आणि लोकप्रीय क्रिकेट लीग आहे. पण या लीगमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना मात्र खेळता येत नाही. शुक्रवारी (31 मार्च) आयपीएल 2023ची सुरुवात दिमाखात झाली. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून चेन्नई सुपर किंग्जचा पराभव देखील झाला. पण यादरम्यान पाकिस्तानमधून एक मोठी प्रतिक्रिया आली. आपल्याला आयपीएलमध्ये खेळता येत नाही, याची चिंता करून नका असा सल्ला पाकिस्तानचे माजी दिग्गज कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे.
इम्रान खान (Imran Khan) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) म्हणजेच बीसीसीआयवर टीका केली. त्यांनी बीसीसीआय अहंकाही आहे, असे म्हटले आहे. इम्रान यांनी टाईम्स रेडिओला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “भारत पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी देत नाही. तर पाकिस्तानी खेळाडूेंनीही याची चिंता करण्याची गरज नाही. कारण आपल्याकडे चांगले युवा खेळाडू आहेत.”
इम्रान पुढे म्हणाला की, “पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध हा एक दुर्दैवी विषय आहे. भारत आता क्रिकेटजगात एखाद्या महाशक्तीप्रमाणे आहे. ते ज्या पद्धतीने वागतात, त्यातून त्यांच्यात असलेला अहंकार दिसतो. भारताकडे इतर देशांच्या (संघांच्या) तुलनेत अधिक मालमत्ता आहे. ते एका महाशक्तीप्रमाणे कोण त्यांच्याविरुद्ध खेळणार आणि कोण खेळणार नाही, ही गोष्ट ठरवतात.”
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात यांच्यात मागच्या काही महिन्यांमध्ये तनाव अधिकच वाढला आहे. आशिया चषकामुळे दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड आमने सामने आले होते. ताज्या माहितीनुसार मोठ्या वादानंतर ठरल्याप्रमाणे आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. पण भारतीय संघाचे सामने पाकिस्तानबाहेर आयोजित केले जाणार आहेत. आशिया चषकानंतर भारतीय संघाला वनडे विश्वचषक 2023चे यजमानपद भूषवायचे आहे. भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानमध्ये गेला नाही, तर पाकिस्तान देखील वनडे विश्वचषकासाठी भारतात न येण्याची शक्यता आहे. अशात पाकिस्तानचे सामने भारताबाहेर आयोजित केला जाणार का? हा महत्वाचा प्रश्न सध्या चाहत्यांना पडला आहे. (India is arrogant, Imran Khan targets BCCI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्याच सामन्यात झाली धोनीला दुखापत? प्रशिक्षक म्हणतायेत, “वयाच्या या टप्प्यावर…”
“तो संघात असल्यावर काळजी नसते”, कर्णधार हार्दिककडून राशिदचे तोंडभरून कौतुक