---Advertisement---

टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतच सरस! वर्ल्डकपमध्ये चकित करणारी कामगिरी, पाहा भन्नाट आकडेवारी

On: रविवार, ऑक्टोबर 30, 2022 12:50 PM
guwahati ind vs sa
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात रविवारी (30 ऑक्टोबर)टी20 विश्वचषकाच्या सुपर 12च्या दुसऱ्या गटातील भारत-दक्षिण आफ्रिका भिडणार आहेत. पर्थमध्ये हा सामना भारताच्या प्रमाणवेळेनुसार दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी खेळला जाणार आहे. दोन्ही संघातील हा यावर्षीचा नववा टी20 सामना असणार आहे. टी20 विश्वचषकाआधी दोन्ही संघांनी भारतात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली, ज्यामध्ये भारत 2-1ने जिंकला.

या स्पर्धेत भारत सलग दोन सामने जिंकत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे, मात्र नेट रनरेट दक्षिण आफ्रिकेचा जबरदस्त आहे. त्याचबरोबर दोन्ही संघांची टी20मध्ये एकमेकांविरुद्धची आकडेवारी पाहिली तर दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसेल. त्याचबरोबर टी20 विश्वचषकात तर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कहरच केला आहे.

टी20 क्रिकेटमध्ये भारतच दक्षिण आफ्रिकेवर भारी
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये भारत-दक्षिण आफ्रिका 24व्यांदा समोरासमोर येणार आहे. त्याआधी झालेल्या 23 सामन्यांमध्ये भारताचे पारडे जड ठरले. भारताने 13 आणि दक्षिण आफ्रिकेने 9 सामने जिंकले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.

टी20 विश्वचषकात भारत वि. दक्षिण आफ्रिका
आयसीसी टी20 विश्वचषकात हे दोन्ही संघ पाच वेळा समोरासमोर आले आहेत. त्यामध्ये भारताचा खेळ उंचावला असून चार सामने जिंकले आहेत. टी20 विश्वचषकात केवळ एकदाच दक्षिण आफ्रिका भारताविरुद्ध जिंकला आहे. 2009मध्ये नॉटींघममध्ये झालेला तो सामना भारताने 12 धावांनी गमावला होता. टी20 विश्वचषकात भारताने 2007, 2010, 2012 आणि 2014मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक टी20 धावा करणारे भारतीय-
405 – रोहित शर्मा*
339 – सुरेश रैना
306- विराट कोहली*
233 – शिखर धवन
215 – दिनेश कार्तिक*

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक टी20 विकेट्स घेणारे भारतीय-
14 – भुवनेश्वर कुमार
10 – आर अश्विन
9 – हर्षल पटेल
7 – युझवेंद्र चहल
6- झहीर खान

भारत वि. दक्षिण आफ्रिका (टी20)
23 – सामने
13 – भारत
9 –  दक्षिण आफ्रिका
1 – अनिर्णीत

भारत वि. दक्षिण आफ्रिका (टी20 विश्वचषक)
5 – सामने
4 – भारत विजेता
1 – द. आफ्रिका विजेता

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पर्थमध्ये पाकिस्तानची झिम्बाब्वेविरुद्ध एक ‘चूक’, भारताला सामना जिंकण्यास त्याची पुनरावृत्ती टाळावी लागेल
भारतासाठी धोका! 7 डाव.. 2 शतके आणि 1 अर्धशतक ‘हा’ आफ्रिकन फलंदाज 6 वर्षांनंतर संघात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---