दक्षिण आफ्रिकेने ‘जागतिक कसोटी चॅम्पियशिप’च्या (World Test Championship 2025) फायनलमध्ये थाटात एँट्री केली आहे. आता दुसरा कोणता संघ फायनलमध्ये एंट्री मारेल याची सर्वांनाच उत्सुकला लागली असेल. तत्पूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया संघात मेलबर्नमध्ये कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू आहे. हा सामना सध्या बरोबरीच्या दिशेने जात आहे. मात्र, सामन्याच्या शेवटच्या दिवशी काय होईल, कोणता संघ बाजी मारेल हे सांगता येणार नाही. दरम्यान जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेवर नजर टाकली तर भारत सध्या मागे असल्याचे दिसत आहे.
सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरूद्ध कसोटी सामना खेळला. या रोमहर्षक लढतीत त्यांनी पाकिस्तानचा 2 गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आफ्रिकन संघ सध्या या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आफ्रिकेने 11 कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्यांनी 7 सामने जिंकले, 3 हरले. यासह एक सामना अनिर्णित राहिला. त्याच्या गुणांची टक्केवारी सध्या 66.67 आहे.
ऑस्ट्रेलिया सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने 15 सामने खेळले असून 9 सामने जिंकले आहेत, तर 4 सामने गमावले आहेत. 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या विजयी गुणांची टक्केवारी 58.89 आहे. तर भारताची 55.88 आहे. या कारणामुळे भारत तिसऱ्या स्थानी आहे. पण भारताने मेलबर्न सामना जिंकला तर परिस्थिती बदलू शकते.
आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेचे नियम निश्चित आहेत. जर संघ जिंकला तर त्याचे 12 गुण होतात. जर कसोटी सामना बरोबरीत राहिला तर दोन्ही संघांना 6-6 गुण मिळतात. जर सामना अनिर्णित राहिला तर 4 गुण मिळतात. गुणांच्या टक्केवारीनुसार संघांची क्रमवारी निश्चित केली जाते. गुणतालिकेत अव्वल 2 संघ फायनलमध्ये प्रवेश करतात.
महत्त्वाच्या बातम्या-
चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने डाव का घोषित केला नाही? स्टार खेळाडूने सांगितले कारण
भारताची स्टार नेमबाज मनू भाकर ‘स्पोर्ट्स आयकॉन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित
रोहितच्या नेतृत्वावर माजी दिग्गजाची तिखट प्रतिक्रिया! म्हणाला, “जर मी आता निवडकर्ता असतो, तर…”