कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धा 22 जूनपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या नवीन जर्सीचे आज, 20 जूनला अनावरण करण्यात आले आहे.
ही जर्सी निळ्या रंगाची आहे. तर खांद्याच्या आणि हाताच्या वरच्या बाजूला आकाशी रंग आहे.
याआधी 2016ला अहमदाबादमध्ये झालेल्या विश्वचषकाच्यावेळी भारतीय संघाच्या जर्सीचे अनावरण भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपील देव यांच्या हस्ते करण्यात आले होते. यानंतर आता पुन्हा भारतीय संघाच्या नवीन जर्सीचे अनावरण करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी चाहत्यांना महाराष्ट्राचा रिशांक देवाडीगा 14 क्रमांकाची जर्सी घालून खेळताना दिसेल. तर प्रो कबड्डीचा पोस्टर बॉय राहुल चौधरीचा जर्सी क्रमांक 12 आहे. तसेच भारताचा कर्णधार अजय ठाकूर 1 क्रमांकाची जर्सी घालणार आहे.
या नवीन जर्सीचे फोटो खेळाडूंनी सोशल मिडियावर शेअर केले आहे.
https://www.instagram.com/p/BkPLN0ngLt5/?taken-by=girishernak
https://www.instagram.com/p/BkPRY19jhQ3/?taken-by=surender.nada1
भारताचा संघ या स्पर्धेसाठी 19 जूनला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईला रवाना झाला आहे.
भारताचा पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध 22 जूनला होणार आहे. हा सामना या स्पर्धेतील सलामीचा सामनाही असणार आहे.
भारतीय संघ साखळी फेरीत अ गटातून खेळेल. या गटात भारतासह पाकिस्तान आणि केनिया संघाचाही समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–कबड्डी मास्टर्स स्पर्धेसाठी टीम इंडिया दुबईला रवाना
–कबड्डी मास्टर्स दुबईमध्ये टीम इंडियात तब्बल ४ करोडपती खेळाडूंचा समावेश
–तीन दिग्गज खेळाडूंशिवाय कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत खेळणार इराण