रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामाला कानपूरमध्ये शनिवारी (10 सप्टेंबर) सुरुवात झाली. इंडिया लिजेंड्स व दक्षिण आफ्रिका लिजेंड्स यांच्यातील या पहिल्या सामन्यात इंडिया लिजेंड्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 3 बाद 217 धावा केल्या. स्टुअर्ट बिन्नीचे झंझावाती अर्धशतक व युसूफ पठाणची स्फोटक नाबाद खेळी इंडिया लिजेंड्सच्या डावाचे वैशिष्ट्य राहिले.
🇮🇳India Legends started the tournament with a bang!💥
Stuart Binny's 82* well supported & finished by Yusuf Pathan's quick 35* off 15 deliveries put Indians in a strong position.
🇿🇦South African legends need to put some hard yards today!#RoadSafetyWorldSeries #RSWS #INDLvsSAL pic.twitter.com/awiTqerFMf— Road Safety World Series (@RSWorldSeries) September 10, 2022
पहिल्या हंगामाच्या यशानंतर आता या दुसऱ्या हंगामाला कानपूर येथे सुरुवात झाली. छोटेखानी समारंभात स्पर्धेचे उद्घाटन झाले. इंडिया लिजेंड्स व दक्षिण आफ्रिका लिजेंड्स यांच्यातील सामन्यात इंडिया लिजेंड्सचा कर्णधार सचिन तेंडुलकरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सचिन तेंडुलकर व नमन ओझा यांनी भारतीय संघाला 46 धावांची सलामी दिली. मात्र, सचिन व नमन सहा धावांच्या अंतराने बाद झाले. त्यानंतर या स्पर्धेत पदार्पण करत असलेल्या सुरेश रैनाने 33 धावांची शानदार खेळी केली.
चौथा क्रमांकवर आलेला स्टुअर्ट बिन्नी सुरुवातीला थोडाफार अडखळत खेळत होता. मात्र, जम बसल्यानंतर त्याने वेगवान फलंदाजी केली. युवराज सिंग मात्र केवळ 6 धावा करत तंबूत परतला. मात्र त्यानंतर आलेल्या युसुफ पठाणने बिन्नीसह मैदानावर अक्षरशः धावांचा पाऊस पडला. त्यांनी चौथ्या गड्यासाठी 88 धावांची भागीदारी केली. बिन्नीने 42 चेंडूवर 5 चौकार व 6 षटकार ठोकत नाबाद 82 धावा केल्या. तर, पठाणने 15 चेंडूवर 1 चौकार व 4 षटकारांसह 35 धावांचा तडाखा दिला.