---Advertisement---

दिग्गजांचे द्वंद्व हुकले! पावसाच्या व्यत्ययाने इंडिया लिजेंड्स विरूद्ध वेस्ट इंडिज लिजेंड्स सामना रद्द ‌

On: बुधवार, सप्टेंबर 14, 2022 9:05 PM
---Advertisement---

रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. कानपूर येथे होत असलेल्या या स्पर्धेच्या पाचव्या दिवशी इंडिया लिजेंड्स विरुद्ध वेस्ट इंडीज लिजेंड्स हा सामना खेळला जाणार होता. मात्र, पावसामुळे खराब झालेले मैदान पूर्ववत होऊ न शकल्याने हा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. एकाच जमान्यातील दोन दिग्गज सचिन तेंडुलकर व ब्रायन लारा यांना पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध लढताना पाहण्याची पर्वणी चाहत्यांना मिळू शकली नाही.

https://twitter.com/RSWorldSeries/status/1570060497084633088?t=Q24G40dydh_VB2YZz4qRow&s=19

 

स्पर्धेत गतविजेता असलेल्या इंडिया लिजेंड्सने यावर्षी आपल्या हंगामाची विजयाने सुरुवात केली होती. त्यांनी सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव केलेला. तर, वेस्ट इंडिज लिजेंड्सनेही आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेश लिजेंड्सविरूद्व विजय संपादन केलेला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या- 
ऑस्ट्रेलियात रोहित-राहुल अन् पंतची बॅट होते म्यान! आशा फक्त विराटवर; पाहा आकडेवारी
टी-20 विश्वचषकात होणार हर्षल पटेलची धुलाई? पत्रकाराच्या प्रश्नावर गावसकरांचे रोखठोक उत्तर, म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---