रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज आजपासून (10 सप्टेंबर) सुरू होत आहे. पहिल्या दिवशी भारत लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका दिग्गज आमनेसामने आहेत. भारतीय संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सिक्सर किंग युवराज आणि टर्बनेटर हरभजन सिंग यांच्यासह अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटू आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघात जॉन्टी रोड्स, मखाया अँटोनी आणि लान्स क्लुसनरसारखे स्टार खेळाडूही दिसणार आहेत.
हा सामना कधी आणि कुठे बघायचा?
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा हा सलामीचा सामना आज (10 सप्टेंबर) संध्याकाळी 7.30 वाजता कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स-18 वाहिनीवर केले जाणार आहे. यासोबतच या मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग व्हूट ऍपवरही पाहता येईल.
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे स्वरूप काय आहे?
21 दिवस चालणाऱ्या या मालिकेत आठ संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघ साखळी टप्प्यात 5-5 सामने खेळेल. अशाप्रकारे 10 ते 27 सप्टेंबर दरम्यान एकूण 20 सामने खेळवले जाणार आहेत. पहिले 7 सामने कानपूरमध्ये, पुढील 5 सामने इंदूरमध्ये, 6 सामने डेहराडूनमध्ये आणि 2 सामने रायपूरमध्ये होतील. येथे टॉप-4 संघांना उपांत्य फेरीत स्थान मिळेल आणि त्यानंतर अंतिम फेरी होईल. हे तीनही सामने रायपूरमध्येच होणार आहेत. अंतिम सामना 1 ऑक्टोबरला होणार आहे.
या दिग्गजांचा समावेश इंडिया लीजेंड्समध्ये होतो
सचिन तेंडुलकर (कर्णधार), सुरेश रैना, युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, हरभजन सिंग, मुनाफ पटेल, सुब्रमण्यम बद्रीनाथ, स्टुअर्ट बिन्नी, नमन ओझा, मनप्रीत गोनी, प्रज्ञान ओझा, विनय कुमार, अभिमन्यू मिथुन, राजेश पनवार आणि राहुल शर्मा .
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ASIA CUP: पाकिस्तानला हरवण्याचे षडयंत्र रचण्यात वसीम अकरमचा हात, पाहा संपूर्ण व्हिडिओ
‘ले गयी दिल मेरा मनचली’ गाण्यावर धवल कुलकर्णीचं भन्नाट ड्रम वादन, पाहा व्हिडीओ