रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 चा अंतिम सामना शनिवारी, 1 ऑक्टोबर खेळला गेला. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाती इंडिया लिजेड्सने हा सामना 33 धावांनी जिंकला. इंडिया लिजेंड्ससमोर या सामन्यात श्रीलंका लिजेड्स संघाचे आव्हान होते. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 6 विकेट्सच्या नुकसानावर 195 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकन संघाने 162 धावा करून सर्वच्या सर्व विकेट्स गमावल्या. ही सलग दुसरी वेळ आहे, जेव्हा भारताने ही ट्रॉफी जिंकली
Congratulations Team India Legends!
We won the Championship again !
What an overwhelming moment! pic.twitter.com/XE1srvXU1e— India Legends (@India__Legends) October 1, 2022
इंडिया लिजेंड्स () संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतासाठी सचिन तेंडुलकर आणि नमन ओझा (Naman Ojha) यांनी डावाची सुरुवात केली. सचिन क्लीन डक (0) झाला, पण ओझाने 71 चेंडूत 108 धावांची वादळी खेली केली. त्याव्यतिरिक्त विनय कुमार संघासाठी दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. विनयने 21 चेंडूत 36 धावा केल्या. श्रीलंकेच्या नुवान कुलसेकरा (Nuwan Kulasekara) याने तीन षटका टाकून 29 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक 3 विकेट्स देखील घेतल्या. इसुरू उडान (Isuru Udana) याने चार षटकात 34 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या.
2021: 🇮🇳 India Legends defended 181 runs against 🇱🇰 Srilanka Legends in #RSWS Season 1 finals.
2022: 🇮🇳 India Legends defended 195 runs against 🇱🇰 Srilanka Legends in #RSWS Season 2 finals.@indialegends ARE THE CHAMPIONS AGAIN!#RoadSafetyWorldSeries #RSWS #YehJungHaiLegendary pic.twitter.com/CUSAt05M8i
— Road Safety World Series (@RSWorldSeries) October 1, 2022
भारताने दिलेल्या 196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका लिजेंड्सची वरची फळी अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. दिलशान मनुवीरा (Dilshan Munaweera) आणि सनथ जयसूर्या यांनी अनुक्रमे 8 आणि 5 धावा करून विकेट गमावल्या. इशान जयरत्ने (Ishan Jayaratne) याने श्रीलंकेसाठी सर्वात मोठी खेळी केली. त्याने अवघ्या 22 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. पण त्याला संघातील इतर एकही फलंदाज चांगली साथ देऊ शकला नाही. विनय कुमराने भारतासाठी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने 3.5 षटकात 38 धावा खर्च केल्या. तसेच अभिमन्यू मिथूनने चार षटकात 27 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दिप्ती शर्माच्या धावबाद प्रकरणामुळे पेटले ‘ट्वीटर वॉर’, हर्षा भोगलेंच्या ट्वीटला बेन स्टोक्सकडून प्रत्युत्तर
१६ वर्षांखालील हॉकी स्पर्धा | विवेक सिंग अकादमीचा चुरशीचा विजय