भारतीय संघाने नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ असा विजय मिळवला. यासह भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही स्थान मिळवले. आता येत्या जून महिन्यात १८ तारखेपासून हा अंतिम सामना साउदम्प्टनच्या मैदानावर खेळवला जाईल.
मात्र या सामन्यामुळे आता आशिया कप २०२१च्या आयोजनात काहीसा अडथळा निर्माण झाला आहे. आशिया कप आपल्या नियोजित वेळापत्रकानुसार जून महिन्यात श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. मात्र याच दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार असल्याने अशा परिस्थितीत भारत आपला ‘ब’ संघ आशिया कप स्पर्धेत पाठवू शकतो.
आयपीएल संपताच इंग्लंडला रवाना होणार भारतीय संघ
येत्या एप्रिल-मे महिन्यात इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. ३० मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाईल. यानंतर भारतीय संघ लगेचच इंग्लंकडे रवाना होईल. १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी पार पडेल. त्यांनतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमध्येच भारतीय संघ कसोटी मालिका खेळेल.
आता या परिस्थितीत आशिया कप स्पर्धेबाबत मात्र प्रश्न निर्माण झाला आहे. आशिया कपचे यापूर्वी दोनदा आयोजन पुढे ढकलण्यात आले होते. त्यामुळे यंदाचे जून महिन्यातील आयोजन पुढे ढकलणे, परवडणारे नाही. अशावेळी मग भारत या स्पर्धेत आपला ‘ब’ संघ उतरवू शकतो. कारण याशिवाय दुसरा पर्याय देखील सद्यस्थितीत उपलब्ध नसल्याचे समजते.
मागील वर्षी कोरोना विषाणूमुळे आशिया कप स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी जून महिन्यात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहाच आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष असल्याने हे आयोजन होणार, हे जवळपास पक्के आहे. त्यामुळे कदाचित आगामी काळात भारताचे दोन संघ एकाच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतांना दिसू शकतात.
महत्वाच्या बातम्या:
नव्या कर्णधारासह राजस्थान दुसऱ्या जेतेपदावर लावणार मोहर? वाचा कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध होणार लढत
ठरलं तर! जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लॉर्डस नाही, तर होणार या मैदानावर
WI vs SL : निर्णायक सामन्यात विजय मिळवत वेस्ट इंडिजने टी२० मालिकेवरही केला कब्जा