जागतिक बॉक्सिंग असोसिएशनने (एआयबीए) भारताकडून २०२१मध्ये होणाऱ्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशीपचे यजमानपद काढून घेतले आहे. एआयबीएच्या मते, भारतीय बॉक्सिंग महासंघ यजमानपदाचे शुल्क भरण्यास अयशस्वी राहिले. विशेष म्हणजे ही रक्कम केवळ ५०० अमेरिकन डॉलर म्हणजे ३७,५०० रुपये इतकीच होती.
यापूर्वी भारतीय संघाला २०१७मध्ये पहिल्यांदा या स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते. या वेळच्या स्पर्धेचे आयोजन नवी दिल्ली मध्ये होणार होते. परंतु आता भारताकडून आता यजमानपद काढून घेतले आहे.
एआयबीएने (International Boxing Association) जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशीपच्या नव्या यजमानाची घोषण केली आहे. आता २०२१मध्ये ही स्पर्धा सर्बियाच्या बेलग्रेड (Belgrade ) या शहरात होणार आहे.
एआयबीएचे अध्यक्ष मोहम्मद मौस्ताहसने सांगितले की, सर्बियासाठी ही खूप मोठी स्पर्धा असणार आहे. सर्बियाकडे एवढ्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सर्वकाही आहे. त्यांच्याकडे ऍथलीट, प्रशिक्षक आणि अधिकारी येथे चांगल्याप्रकारे काम करतील.
भारतीय बॉक्सिंग असोसिएशनला २०१८मध्ये एआयबीएने चेतावणी दिली होती. ज्यावेळी कोसोवोची बॉक्सर दोंजेता सदिकूला भारताने व्हिसा नाकारला होता. यानंतर आंतरराष्ट्रीय वाद निर्माण झाला होता. तसेच एआयबीएने चेतावणी दिली होती की, भविष्यात भारतात होणाऱ्या खेळांवर याचा परिणाम पडू शकतो.
भारताने कोसोवोची (Kosova) बॉक्सरला व्हिसा न देण्याचे कारण म्हणजे भारत कोसोवाला स्वतंत्र देश समजत नाही. खरंतर भारत आणि रशियाची मैत्री आहे. जर भारताने असे काही केले तर रशिया आणि भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांंवर परिणाम होऊ शकतो.
शेवटी २०१८ची ही चेतावणी खरी ठरली आहे. एआयबीएने भारताकडून बॉक्सिंग चॅम्पियनशीपचे यजमानपद काढून घेतले आहे. त्यामुळे याचे कारण यजमानपदाचे शुल्क न भरणे सांगण्यात आले आहे.
वाचनीय लेख-
-त्यांचा स्वत:चा मुलगा भारताकडून खेळू शकला नाही परंतु रोहितला मात्र त्यांनी घडवले
-रोहित शर्माकडे एकेकाळी शाळेची फी भरायलाही नव्हते पैसे, अशी भागवायचा गरज
-खेळाडू म्हणून ५ पैकी ५ आयपीएल फायनल जिंकणारा रोहित जगातील एकमेव खेळाडू