भारतीय पुरूष क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची टी20 मालिका भारताने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली 1-0 अशी जिंकली. त्यानंतर वनडे मालिका खेळली जात असून त्यातील पहिला सामना शुक्रवारी (25 नोव्हेंबर) ऑकलंड येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने 7 विकेट्सने बाजी मारली आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताने या पराभवाबरोबरच इतिहास रचला आहे.
भारताने न्यूझीलंडविरुद्ध सलग पाच वनडे सामने गमावण्याचा नकोसा विक्रम केला. भारताने न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये शेवटचा विजय तीन वर्षापूर्वी म्हणजे फेब्रुवारी 2019मध्ये मिळवला होता. भारताने 2019मध्ये न्यूझीलंडचा दौरा केला. त्यामध्ये पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले तीन सामने भारत विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वाखाली खेळले आणि जिंकले. नंतरचे दोन सामने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली खेळले. ज्यामधील चौथा सामना संघाने गमावला आणि पाचवा सामना जिंकला.
त्या दौऱ्यातील पाचवा सामना भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा वनडेतील शेवटचा विजय ठरला. या सामन्यात भारताने अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याच्या 90 धावांच्या जोरावर सर्वबाद 252 धावसंख्या उभारली होती. हा सामना भारताने 35 धावांनी जिंकला होता. यानंतर दोन्ही संघ 2019च्या वनडे विश्वचषकात समोरासमोर आले. ज्यामध्ये भारत 18 धावांनी हरला होता.
भारताने 2020मध्ये पुन्हा एकदा न्यूझीलंडचा दौरा विराटच्या नेतृत्वाखाली केला. ज्यातील तिन्ही सामने भारताने गमावले. आता भारताने शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या नेतृत्वाखाली गमावलेला सामना भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा वनडेतील पहिल्यांदाच सलग पाचवा पराभव ठरला. India lost back to back five ODI matches against New Zealand
https://twitter.com/BLACKCAPS/status/1596072055635861504?s=20&t=A6ILoLeSqdmO1AX-D_aajA
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. भारतानेही उत्तम सुरूवात केली. धवन, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने 7 विकेट्स गमावत 306 धावसंख्या उभारली होती. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा विकेटकीपर-फलंदाज टॉम लॅथम याने नाबाद 145 धावा केल्या. त्याबरोबरच कर्णधार केन विलियम्सन 94 धावा करत नाबाद राहिला.
या मालिकेतील दुसरा सामना 27 नोव्हेंबरला हॅमिल्टन येथे खेळला जाणार आहे. मालिकेत आपले आव्हान टिकून राखण्यासाठी हा सामना जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: वॉशिंग्टनची ‘सुंदर’ बॅटिंग, खेळलेला भन्नाट शॉट होतोय व्हायरल
ब्रेकिंग! पहिल्या वनडेत धावांचा पाऊस, किवींकडून भारताचा धक्कादायक पराभव, फलंदाजांनी कमावलं पण गोलंदाजांनी गमावलं






