---Advertisement---

IND vs ENG । पदार्पण असावे तर असे! टॉम हार्टिलीच्या फिरकीत अडकल्याने हैदराबाद कसोटीत भारत पराभूत

On: रविवार, जानेवारी 28, 2024 5:40 PM
Tom Hartley with Test squad
---Advertisement---

इंग्लंड संघाने हैदराबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी जोरदार पुनरागमन केले. भारताने हा सामना 28 धावांनी गामवला. संघ दबावात अशताना आठव्या विकेटसाठी रविचंद्रन अश्विन आणि केएस भारत यांनी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांच्या भागीदारीमुळेच बारतीय संघाच्या हातून निसटत असललेला सामना पुन्हा नियंत्रणात आला. पण ही जोडी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. इंग्लंडसाठी या सामन्यातून पदार्पण करणारा टॉम हार्टली याने मॅचविनरटी भूमिका पार पाडली.

शेवटच्या डावात विजयासाठी भारताला 231 धावांचे लक्ष्य मिळाले. पण एकही फलंदाज या डावात अर्धशतक करू शकला नाहीये. चौथ्या दिवसाचा खेळ ओली पोप (148*) आणि रेहान अहमद (16*) यांनी केली. त्यावेळी इंग्लंडची धावसंख्या 6 विकेट्सच्या नुकसानावर 316 होती. चौथ्या दिवसी दुसऱ्या सत्रात इंग्लंड संघ 420 धावा करून सर्वबाद झाला. पहिल्या डावात भारतीय संघ 190 धावांनी आघाडीवर असल्यामुळे शेवटच्या डावात भारताला 231 धावांचे लक्ष्य मिळाले. अवघ्या 4 धावा कमी पडल्याने ओली पोलचे द्विशतक हुकले. ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली.

चौथ्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीला आल्यानंतर 231 धावांचे लक्ष्य त्यांच्यासाठी जास्त कठीण वाटत नव्हते. सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्यात पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी झाली होती. पण 12व्या षटकात जयस्वाल वैयक्तिक 15 धावा करून बाद झाला. शुबमन गिल याची बॅट पुन्हा एकदा शांत राहिली. याच षटकात गिल देखील शुन्यावर तंबूत परतला. केएल राहुल 22, अक्षर पटेल 17, श्रेयस अय्यर 13, रविंद्र जडेजा 2, केएस भरत 28 , रविचंद्रन अश्विन 28 आणि मोहम्मद सिराज याने 12 धावा केल्या. जसप्रीत बुमराह 6* धआवांसह नाबाद राहिला. भारताने 69.2 षटकांमध्ये 202 धावांपर्यंत मजल मारली आणि संघ सर्वबाद झाला.

दुसरीकडे इंग्लंडसाठी टॉम हार्टली याने 26.2 षटकांमध्ये 62 धावा खर्च करून सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. जो रुट आणि जॅक लीच यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतासाठी कर्णधार रोहित शर्मा याने सर्वाधिक 39 धावांची खेळी केली. हैदराबादमध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात विजय मिळवणारा इंग्लंड केवळ पहिलाच संघ ठरला आहे.

तत्पूर्वी पहिल्या डावात इंग्लंडने 246, तर भारताने 426 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात इंग्लंड संघ 420 धावा करू नबाद झाल्यानंतर भारतीय संघ 231 धावांचे लक्ष्य सहज गाठण्याची शक्यात होती. पण टॉम हार्टली याच्या फरिकी गोलंदाजीच्या जाळ्यात भारतीय फलंदाज अडकले. या विजयानंतर पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत इंग्लंड संघ 0-1 अशा आघाडीवर आहे. (India lost by 28 runs to England in Hyderabad Test)

महत्वाच्या बातम्या – 
Shamar Joseph । ज्याचा अंगठा तोडला, त्याने गाबा कसोटीत मोडून काढला ऑस्ट्रेलियाचा गर्व, यजमानांचा लाजिरवाना पराभव
 AUS vs WI । कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील मोठा उलटफेर! कॅरेबियन गोलंदाजांकडून यजमान ऑस्ट्रेलियाला धक्का

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---