भारतीय महिला हॉकी संघाने सोमवारी (०२ ऑगस्ट) इतिहास रचला आहे. टोकियो ऑलिंपिक २०२० मधील उपांत्यपुर्व सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला चितपट करत त्यांनी पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. गुरजीत कौरच्या एकमेव गोलच्या साहाय्याने भारताने ३ वेळच्या ऑलिंपिक विजेत्या ऑस्ट्रेलिया हॉकी संघाला १-० ने पराभूत केले आहे.
भारतीय महिला हॉकीपटूंनी पहिल्या क्वार्टरमध्ये प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियावर दबदबा कायम ठेवला होता. पहिल्या क्वार्टरमध्ये मिळालेल्या पेनल्टी कार्नरमध्ये भारताकडून गुरजीत कौरने पहिला गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने आक्रमक खेळ दाखवला. परंतु त्यांना सामन्यात पुनरागमन करता आले नाही. शेवटच्या क्वार्टरमध्येही ऑस्ट्रेलिया संघ पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेण्यात अयशस्वी ठरला.
6️⃣0️⃣ minute, ye 6️⃣0️⃣ minute hum hamesha yaad rakhenge. 🇮🇳
The Indian Women's Hockey team are through to the semis. 💙#AUSvIND #HaiTayyar #IndiaKaGame #Tokyo2020 #TeamIndia #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/qjh4ebNUbC
— Hockey India (@TheHockeyIndia) August 2, 2021
यासह ऑलिंपिकच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हे भारतीय महिला हॉकी संघाने तिसरे ऑलिंपिक असून यापुर्वी त्यांनी १९८० मध्ये मॉस्को ऑलिंपिक आणि २०१६ साली रियो ऑलिंपिकमध्ये भाग घेतला होता.
Dream big. Create H. I. S. T. O. R. Y. 🇮🇳#HaiTayyar #IndiaKaGame #Tokyo2020 #TeamIndia #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/5AvePrj1N5
— Hockey India (@TheHockeyIndia) August 2, 2021
विशेष बाब म्हणजे, रविवारी भारतीय पुरुषांच्या हॉकी संघाने ग्रेट ब्रिटेनवर ३-१ ने विजय ४९ वर्षांनंतर ऑलिंपिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यापुर्वी १९७२ मध्ये भारतीय पुरुषांची ही कामगिरी केली होती. त्यामुळे यंदाच्या ऑलिंपिकमध्ये भारतीय हॉकी संघाकडून पदकाची अपेक्षा आहे.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
खुशखबर! १९७२ नंतर भारतीय पुरुष हॉकी संघाची पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये धडक; ग्रेट ब्रिटनवर ३-१ ने विजय