आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला चांगली सुरुवात करण्यात अपयश आले आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघावर १० गडी राखून विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला होता. या दोन्ही सामन्यात भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाज फ्लॉप ठरले आहेत. त्यामुळे ३ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारतीय संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात.
भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “खेळपट्टीवर गती आणि बाऊंस कमी जास्त आहे. त्यामुळे फलंदाजांना स्ट्राइक रोटेट करण्यात अडचणीचा सामना करावा लागत आहे. आमचे फलंदाज ते शॉट खेळू शकत नाहीये, जे त्यांना खेळायचे आहेत. आशा करतो की, पुढे सर्व ठीक होईल. माझा या संघासोबतचा अनुभव खूप चांगला होता. मी पुन्हा एकदा अर्ज दिला आहे. जर मला पुन्हा एकदा संधी मिळाली तर आणखी चांगले होईल.”
तसेच विक्रम राठोड यांनी पुढे खुलासा करत म्हटले की, “अफगाणिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात काही महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात. न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दुखापतग्रस्त असलेला सूर्यकुमार यादव जर येणाऱ्या सामन्यात फिट असेल तर त्याला ईशान किशनच्या जागी संधी दिली जाऊ शकते. तसेच वरूण चक्रवर्तीच्या जागी आर अश्विनला संधी दिली जाऊ शकते. रवींद्र जडेजाला बाहेर करून विराट कोहली आणखी एक गोलंदाज म्हणून राहुल चाहरला संधी देऊ शकतो.”
अफगाणिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात अशी असू शकते भारतीय संघाची संभावित प्लेइंग इलेव्हेन :
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा/राहुल चाहर, शार्दूल ठाकुर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या पराभवास खेळाडू नाहीतर बीसीसीआय जबाबदार? वाचा संपूर्ण प्रकरण
आयपीएल २०२१ गाजवलेल्या ‘या’ ५ यंगस्टर्सकडे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये असेल सर्वांचेच लक्ष