बांग्लादेशात मोठी सत्तापालट झाली आहे. देशाच्या पंतप्रधान हसीना शेख आपल्या पदाचा राजीनामा देऊन देशातून फरार झाली आहे. आता देशाची कमान लष्कराच्या हाती आहे. या मोठ्या उलथापालथीमध्ये बांग्लादेशमध्ये होणारा महिला टी-20 विश्वचषक 2024 लांबणीवर पडला आहे. यंदाचा टी 20 विश्वचषक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. बांग्लादेशची सध्याची परिस्थिती लक्षात घेता तेथे विश्वचषकाचे आयोजन करणे कठीण वाटत आहे.
क्रिकबझमधील एका अहवालात असे म्हटले आहे की ही स्पर्धा बांग्लादेशबाहेर आयोजित केल्यास आश्चर्य वाटणार नाही. देशात हिंसाचार सुरू असून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय देशात इंटरनेटही बंद आहे.
अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की आयसीसीचा निर्णय एका आठवड्यात येण्याची शक्यता आहे आणि पर्यायी देशांमध्ये भारत प्रबळ दावेदार म्हणून समोर आला आहे.
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देशातून पळून गेल्यानंतर आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आयसीसी बांग्लादेश क्रिकेट बोर्ड, त्यांच्या सुरक्षा एजन्सी आणि आमच्या स्वतःच्या सुरक्षा सल्लागारांच्या समन्वयाने घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.”
महिला टी-20 विश्वचषकाच्या वेळापत्रकात बांग्लादेशच्या दोन ठिकाणांचा समावेश करण्यात आला होता. ढाका येथील शेरे बांगला नॅशनल क्रिकेट स्टेडियम आणि सिल्हेटमधील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम या दोन स्थळांचा समावेश आहे. ही स्पर्धा 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार आहे. या कालावधीत एकूण 23 सामने होणार आहेत.
वास्तविक, टी20 विश्वचषक स्पर्धा बांग्लादेशमध्येच आयोजित केली जाईल की ती अन्य देशात हलवली जाईल याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आयसीसी किंवा बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने उघड केलेली नाही.
हेही वाचा-
दिनेश कार्तिकचा यू-टर्न, लवकरच खेळणार टी20 मालिका, या संघात लागली वर्णी!
मैदानाऐवजी भारतीय खेळाडू माॅलमध्ये व्यस्त; श्रीलंकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यापूर्वी टीम इंडियाची शाॅपिंग
सचिनच्या जिवलग मित्राची प्रकृती बिघडली; चालणे फिरणे झाले कठीण, व्हिडिओ आला समोर