---Advertisement---

बांगलादेशविरुद्ध टीम इंडियात होणार तीन बदल? अशी असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन

On: गुरूवार, सप्टेंबर 14, 2023 10:48 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया चषक खेळत आहे. स्पर्धेतील सुपर फोर फेरीतील अखेरचा सामना भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. शुक्रवारी (15 सप्टेंबर) होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून अजिंक्य राहत अंतिम फेरी खेळण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल. या तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे.

भारतीय संघाने साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेचा प्रारंभ केला होता. मात्र, भारतीय संघाने फलंदाजी केल्यानंतर हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर नेपाळविरुद्ध भारताने दहा गडी राखून मोठा विजय मिळवला. सुपर 4 फेरीमध्ये भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीच्या दिशेने पाऊल ठेवले होते. त्यानंतर श्रीलंकेला 21 धावांनी पराभूत करून त्यांनी अंतिम फेरीत आपली जागा पक्की केली. आता बांगलादेशला पराभूत करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष करून भारताच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांना विश्रांती दिली जाऊ शकते. जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांना या सामन्यात विश्रांती मिळणे नक्की आहे. त्यासोबतच उपकर्णधार हार्दिक पंड्या याला देखील विश्रांती दिली जाऊ शकते. या तिघांच्या जागी मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा व अष्टपैलू शार्दुल ठाकूर यांना संधी देण्यात येईल.

बांगलादेशविरुद्ध संभाव्य भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ईशान किशन, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी व प्रसिद्ध कृष्णा.

(India Might 3 Changes Against Bangaladesh In Super 4 Match Shami Will Back)

हेही वाचा-
कॅलिसने निवडले वर्ल्डकपसाठी टॉप फाईव्ह खेळाडू! ‘ते’ एक नाव चकित करणारे
खुशखबर! श्रेयस पुन्हा उतरला मैदानात, बांगलादेशविरुद्ध खेळणार ‘या’ क्रमांकावर? 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---