---Advertisement---

खुशखबर! श्रेयस पुन्हा उतरला मैदानात, बांगलादेशविरुद्ध खेळणार ‘या’ क्रमांकावर?

On: गुरूवार, सप्टेंबर 14, 2023 6:20 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया चषक खेळत आहे. स्पर्धेतील सुपर फोर फेरीतील अखेरचा सामना भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. शुक्रवारी (15 सप्टेंबर) होणाऱ्या या सामन्याआधी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर येतेय. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी पाठीची दुखापत झालेल्या श्रेयस अय्यर याने सरावास सुरुवात केली असून, तो बांगलादेशविरुद्ध खेळताना दिसू शकतो.

मार्च महिन्यापासून मैदानापासून दूर असलेल्या श्रेयस याला या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात जागा मिळाली होती. पाकिस्तानविरुद्ध साखळी फेरी सामन्यात त्याने पुनरागमन केलेले. या सामन्यात तो 14 धावा बनवण्यात यशस्वी ठरलेल्या. तर नेपाळविरुद्ध त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.

सुपर 4 फेरीतील पाकिस्तानविरुद्ध सामन्याच्या काही मिनिटे आधीच त्याच्या पाठीचे दुखणे पुन्हा उफाळून आले. त्यामुळे त्याला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. तर श्रीलंकेविरुद्ध देखील तो खेळू शकला नव्हता. त्याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती.

गुरुवारी (14 सप्टेंबर) प्रसारण वाहिनीवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये श्रेयस पुन्हा एकदा मैदानावर उतरून सराव करत असलेला दिसला. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध तो खेळताना दिसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. श्रेयस या सामन्यात खेळल्यास ईशान किशन याला बाकावर बसावे लागू शकते. श्रेयस याच्या जागी खेळलेल्या केएल राहुल याने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावल्याने तो चौथ्या क्रमांकावरच खेळण्याची शक्यता आहे.

(Shreyas Iyer Starts Practicing Ahead Clash Against Bangaladesh)

हेही वाचा-
पृथ्वी शॉबाबत धक्कादायक ब्रेकिंग! कोसळलाय संकटांचा डोंगर, लगेच वाचा
ना रोहित ना स्मिथ: वर्ल्डकपमध्ये फक्त दोन चेहरे असे, ज्यांनी केल्यात हजार धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---