भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे. पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ येथे पोहोचला असून, संघाने पहिला सराव सामना देखील खेळला आहे. त्याचवेळी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर हे देखील ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. त्यांनी नुकतीच ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्लेस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान जयशंकर यांनी मार्लेस यांना भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याची स्वाक्षरी असलेली बॅट भेट दिली.
जयशंकर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे मुद्दे प्रभावीपणे मांडण्यासाठी ओळखले जातात. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी युक्रेन रशिया युद्धावेळी निर्णायक भूमिका पार पाडली होती. त्यानंतर आता ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यावर ते अनेक महत्त्वपूर्ण करारांविषयी चर्चा करतील.
त्याच अनुषंगाने त्यांनी सोमवारी (10 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्लेस यांची भेट घेतली. यावेळी जयशंकर यांनी भारताचा महान क्रिकेटपटू विराट कोहली याची स्वाक्षरी असलेली बॅट मार्लेस यांना भेट दिली. मार्लेस यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. त्यांनी लिहिले,
A pleasure to host @DrSJaishankar here in Canberra.
There are many things which bind us, including our love of cricket.
Today, he surprised me with a signed bat from cricket legend @imVkohli pic.twitter.com/2FE0qIJnPc— Richard Marles (@RichardMarlesMP) October 10, 2022
‘कॅनबरा येथे डॉक्टर जयशंकर यांचे आदरातिथ्य करण्याचे भाग्य लाभले. या भेटीत अनेक गोष्टींवर चर्चा झाली. यामध्ये क्रिकेटविषयी असलेले दोन्ही देशांचे प्रेमही सामील होते. विराट कोहलीची स्वाक्षरी असलेले बॅट देऊन त्यांनी मला चकित केले.’
जयशंकर यांनी मागील महिन्यात केलेल्या न्यूझीलंड दौऱ्यावरही क्रिकेटविषयी मोठे वक्तव्य केलेले. भारत आणि न्यूझीलंड क्रिकेटवेडे देश असल्याचे त्यांनी म्हटलेले. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक जॉन राईट व मागील 15 वर्षापासून आयपीएलमध्ये प्रशिक्षक असलेल्या स्टीफन फ्लेमिंग यांचा त्यांनी उल्लेख केलेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘यॉर्कर किंग’ बुमराहला कपिल पाजींनी करून दिली राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव, एकाच ओळीत केले ‘क्लीन बोल्ड’
याचं करायचं काय? सराव सामन्यातही सपशेल अपयशी ठरला रिषभ; 17 चेंडू खेळून पण…