शनिवारी (दि. 21 जानेवारी) रायपूर येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला मोठी धावसंख्या करू दिली नाही.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. यावेळी न्यूझीलंड संघाला पूर्ण 50 षटकेही फलंदाजी करता आली नाही. त्यांनी 34.3 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 108 धावा केल्या आणि भारतापुढे 109 धावांचे आव्हान ठेवले. (India need 109 runs to win against new zealand)
Innings Break!
A brilliant bowling performance from #TeamIndia 👏 👏
3⃣ wickets for @MdShami11
2⃣ wickets each for @hardikpandya7 & @Sundarwashi5
1⃣ wicket each for @mdsirajofficial, @imkuldeep18 & @imShardScorecard ▶️ https://t.co/tdhWDoSwrZ #INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/0NHFrDbIQT
— BCCI (@BCCI) January 21, 2023
न्यूझीलंडचा डाव
न्यूझीलंड संघाकडून फलंदाजी करताना एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यातल्या त्यात ग्लेन फिलिप्स याने इतर खेळाडूंच्या तुलनेत 52 चेंडूत 36 धावांचे सर्वाधिक योगदान दिले. या धावा करताना त्याने 5 चौकारांचाही पाऊस पाडला त्याच्याव्यतिरिक्त मिचेल सँटनर (27) आणि मायकल ब्रेसवेल (22) यांनीही संघाच्या धावसंख्येत खारीचा वाटा उचलला. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला 10 धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार टॉम लॅथम (Tom Latham) याने फक्त 1 धाव काढली. त्यामुळे न्यूझीलंडने झटपट विकेट्स गमावत 34.3 षटकात सर्वच्या सर्व विकेट्स गमावल्या.
यावेळी भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 6 षटके गोलंदाजी करताना 18 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीही प्रत्येकी 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनाही प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आले.
भारतीय संघापुढे 109 धावांचे आव्हान
या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारताला न्यूझीलंडने दिलेल्या 109 धावांचे आव्हान पार करावे लागणार आहे. विशेष म्हणजे, पहिला वनडे सामना भारतीय संघाने 12 धावांनी खिशात घातला होता. त्या सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या शुबमन गिल याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आख्ख्या संघाला जे 11 वर्षात जमलं नाही, ते स्मिथने 5 दिवसात करून दाखवलं; आकडेवारी उडवेल तुमचीही झोप
हार्दिकच्या चपळाईपुढे डेवॉन कॉनवेची संयमी खेळी फेल, जबरदस्त झेल घेत दाखवला तंबूचा रस्ता