अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड ओव्हलवर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात पाचव्या दिवशी(10 डिसेंबर) आॅस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात 6 बाद 186 धावा केल्या आहेत. त्यांना अजून विजयासाठी 137 धावांची गरज आहे, तर भारताला विजयासाठी 4 विकेट्सची गरज आहे.
आज आॅस्ट्रेलियाने 4 बाद 104 धावांपासून खेळायला सुरुवात केली. पण सुरुवातीच्या काही वेळातच ट्रेविस हेडला इशांत शर्माने 14 धावांवर असताना बाद केले. हेडचा झेल गलीमध्ये उभ्या असणाऱ्या अजिंक्य रहाणेने घेतला.
त्यानंतर शॉन मार्श आणि आॅस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने डाव सावरत सहाव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी रचली. पण ही जोडी तोडण्यात जसप्रीत बुमराहला यश आले. त्याने मार्शला 60 धावांवर असताना बाद केले. बुमराहने टाकलेला चेंडू मार्शच्या बॅटची कड घेऊन सरळ यष्टीरक्षक रिषभ पंतकडे गेला.
यानंतर मात्र पेन आणि पॅट कमिन्सने आॅस्ट्रेलियाचा डाव सांभाळला असून ते पहिल्या सत्रात अनुक्रमे 40 आणि 5 धावांवर नाबाद आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–आॅस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच असा इतिहास घडवण्याची विराट कोहलीच्या टीम इंडियाला संधी
–Video: आॅस्ट्रेलियन चाहत्यांकडून आपमान झाल्यानंतरही विराट कोहलीने दाखवली खिलाडूवृत्ती
–Video: आॅस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा आऊट होणार हे या दिग्गजाने आधीच ओळखलं!
–गौतम गंभीरची ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीवर कठोर शब्दात टीका