आशियाई क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या आशिया चषक स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. सहा संघांच्या या स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान व नेपाळ यांच्या दरम्यान होणार आहे. सहा संघांना दोन गटात विभागले गेले असून, अ गटात यजमान पाकिस्तान, गतविजेता भारत व प्रथमच आशिया चषक खेळत असलेल्या नेपाळ यांचा समावेश आहे. या गटात पाकिस्तान व भारत हे सुपर फोर फेरीत पोहोचण्याचे दावेदार असले तरी, नेपाळ आपली उपस्थिती दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल.
अ गटात पहिला सामना पाकिस्तान व नेपाळ यांच्या दरम्यान उद्घाटनाच्या दिवशी खेळला जाईल. मुलतान येथे हा सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर या गटातील दुसरा सामना अत्यंत महत्त्वाचा असून, यामध्ये 2 सप्टेंबर रोजी कॅंडी येथे भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला रंगेल. तर गटातील अखेरचा सामना 4 सप्टेंबर रोजी भारत व नेपाळ यांच्या दरम्यान याच कॅण्डी येथील मैदानावर होईल. गटातून अव्वल राहिलेले दोन संघ सुपर फोर फेरीत प्रवेश मिळवतील.
आपण या गटातील तिन्ही संघांवर नजर टाकूया:
आशिया चषक 2023 साठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्ण.
राखीव खेळाडू – संजू सॅमसन.
आशिया चषक 2023 साठी पाकिस्तान संघ –
फखर झमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, उस्मान मीर, मोहम्मद वसिम ज्युनिअर, सौद शकील, मोहम्मद हारिस, तय्यब ताहीर, अब्दुल्ला शफीक.
आशिया चषक 2023 साठी नेपाळ संघ –
रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुरटेल, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, प्रतिश जीसी, मौसम ढकल, संदीप जोरा, किशोर महतो, अर्जुन सौद (यष्टीरक्षक), आसिफ शेख, भीम शार्की, कुशल मल्ला, आरिफ शेख, दीपेंद्र सिंग आयरी (उपकर्णधार), गुलशन झा, सोमपाल कामी, करण के.सी.
(India Nepal And Pakistan Sqauds For Asia Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
मोठ्या टी-20 लीगसाठी स्मृती मंधानाचा नकार! खेळणार मायदेशातील महत्वाची मालिका
आशिया चषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 ऍक्टिव्ह प्लेअर्स, ‘हा’ भारतीय फिरकीपटू टॉपवर