भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे एक अतिशय संयमी व प्रतिभावान खेळाडू आहे. सुरुवातीला संधी मिळाल्यानंतर हा खेळाडू आता मर्यादीत षटकांच्या टीम इंडियात फारसा दिसत नाही.
परंतु ६५ कसोटी, ९० वनडे व २० टी२० सामने खेळलेल्या या खेळाडूच्या नावावर एक खास कारनामा आहे. जेव्हा जेव्हा अजिंक्यने कसोटी किंवा वनडेत शतकी खेळी केलीय तेव्हा कधीही भारतीय संघाचा पराभव झाला नाही.
अजिंक्य रहाणेने ६५ कसोटी सामन्यात ११ तर ९० वनडे सामन्यात ३ अशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १४ शतके केली आहेत. अतिशय मजेशीर गोष्ट ही की यातील एकाही शतकावेळी भारतीय संघाचा पराभव झाला नाही.
कसोटीतील ११ शतकांपैकी ३ सामने अनिर्णित राहिले असून बाकी ८ वेळा टीम इंडिया विजयी झाली आहे. तर वनडेत ३ पैकी ३ शतकांवेळी भारतीय संघाला विजय मिळाला आहे.