IND vs NZ: भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. हे दोन्ही दिग्गज आता फक्त वनडे फॉरमॅटमध्येच खेळताना दिसणार आहेत. त्यामुळेच आता चाहत्यांना आगामी वनडे मालिकांची प्रतीक्षा आहे. यादरम्यान चाहत्यांना एक खूप मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या व्हाईट बॉल (वनडे आणि टी20) मालिकेची आता घोषणा झाली आहे. यासोबतच तारखा आणि ठिकाणांचीही निश्चिती झाली आहे.
पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार, 2026च्या जानेवारी महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांची मालिका खेळली जाईल. या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला हैदराबादमध्ये खेळला जाईल, तर शेवटचा सामना 31 जानेवारीला त्रिवेंद्रममध्ये (Thiruvananthapuram) खेळला जाईल.
वनडे मालिकेदरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील चाहत्यांना दिसू शकतात. मात्र, त्यापूर्वी भारतीय संघ बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील वनडे मालिका खेळू शकते. बीसीसीआयने (BCCI) अद्याप या मालिकेबाबत बैठक घ्यायची आहे. सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे संघाला 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला सामना 20 जूनला हेडिंग्ले येथे खेळला जाईल. दीर्घकाळानंतर भारतीय संघ रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय कसोटी मालिका खेळणार आहे.
भारत-न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक (जानेवारी 2026)
पहिला वनडे सामना: 11 जानेवारी, हैदराबाद
दुसरा वनडे सामना:14 जानेवारी, राजकोट
तिसरा वनडे सामना: 18 जानेवारी, इंदूर
पहिला टी20 सामना: 21 जानेवारी, नागपूर
दुसरा टी20 सामना: 23 जानेवारी, रांची
तिसरा टी20 सामना: 25 जानेवारी, गुवाहाटी
चौथा टी20 सामना: 28 जानेवारी, विजाग (Vizag)
पाचवा टी20 सामना: 31 जानेवारी, त्रिवेंद्रम (Trivandrum)
SCHEDULE OF INDIA Vs NEW ZEALAND 2026: [Kushan Sarkar from PTI]
— Johns. (@CricCrazyJohns) June 14, 2025
1st ODI: 11th Jan, Hyderabad
2nd ODI: 14th Jan, Rajkot
3rd ODI: 18th Jan, Indore
1st T20I: 21st Jan, Nagpur
2nd T20I: 23rd Jan, Ranchi
3rd T20I: 25th Jan, Guwahati
4th T20I: 28th Jan, Vizag
5th T20I: 31st Jan,… pic.twitter.com/dND4VJkuxK






