भारत आणि पाकिस्तान हे दोन देश जेव्हा भिडतात तेव्हा नेहमीच तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत असते. केवळ खेळाडूच नाही तर चाहतेही अनेकदा अतिउत्साही झाल्याचे दिसून येते. असंच काहीसं सध्याही झाल आहे. येत्या २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान संघ आशिया चषकता त्यांचा पहिला सामना खेळणार आहेत. या सामन्याच्या तिकीट विक्रीवेळी चाहत्यांमध्ये तुंबळ रंगल्याचे पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) या सामन्याच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली. यावेळी संध्याकाळी ६ वाजता सुरू होणाऱ्या विक्रीसाठी चाहत्यांनी सकाळी ६ वाजल्यापासूनच तात्कळत नोंदणी करायला सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत अवघ्या २ तासांत सर्व तिकीट विकले गेले असल्याचे तिकीट विक्री करणाऱ्या कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
राहुलचं टेन्शन वाढलंय! स्टार अष्टपैलू खेळडू थेट मालिकेतून होणार बाहेर
वाढदिवस विशेष- कसोटी क्रिकेट गाजवलेल्या चंद्रपाॅलबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी
दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या वार्षिक पुरस्कारांत भारतीयांची बाजी; वाचा संपूर्ण यादी