T20 World Cup 2024: जगभरातील सर्व संघ सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषक 2024 च्या तयारीत व्यस्त आहेत. त्याचबरोबर या विश्वचषकाशी संबंधित महत्त्वाचे अपडेट्स समोर येत आहेत. वृत्तानुसार, 2024 च्या टी20 विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे.
द टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, भारतीय संघाला ग्रुप ए मध्ये ठेवण्यात आले आहे, ज्यामध्ये पाकिस्तान संघही आहे. भारत-पाकिस्तान व्यतिरिक्त या गटातील इतर संघ एवढे मोठे नाहीत. भारत-पाकिस्तानसह यजमान अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंडलाही अ गटात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान स्पर्धा ग्रुप स्टेजमध्येच होणार हे निश्चित झाले आहे.
वृत्तानुसार, भारतीय संघ 4 जूनला आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. दोन्ही संघ बार्बाडोसमध्ये त्यांचे सुपर-8 सामने खेळू शकतात, जिथे अंतिम सामना देखील खेळला जाईल. (india pakistan drawn in group a of 2024 t20 world cup reports)
भारत-पाकिस्तान व्यतिरिक्त इतर गटांबद्दल बोलायचे झाले तर ब गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंड, नामिबिया आणि ओमान संघ आहेत. क गटात न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा आणि पापुआ न्यू गिनी हे संघ आहेत. याशिवाय ड गटात दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड आणि नेपाळ संघ आहेत.
यावेळी 4 जून ते 30 जून 2024 या कालावधीत टी20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज संयुक्तपणे या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार असून एकूण 10 ठिकाणी सामने आयोजित केले जातील. यावेळी 20 संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ सुपर-8 साठी पात्र ठरतील. यानंतर, सुपर-8 संघांची दोन गटात विभागणी केली जाईल आणि दोन्ही गटातील अव्वल दोन संघ अंतिम सामना खेळतील. (India-Pakistan in same group in T20 World Cup rest names are surprising see full list)
हेही वाचा
World Test Championship: आफ्रिके विरूद्धच्या विजयाचा मोठा फायदा! WTCच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया पोहचली टाॅपला
Ranji Trophy: काय सांगता! बिहारने मुंबई विरुद्धच्या रणजी सामन्यासाठी चक्क दोन संघ केले जाहीर, वाचा नक्की काय आहे प्रकरण