कॉमनवेल्थ गेम्समधील पहिल्याच सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला होता. आता टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. संघाचा दुसरा सामना रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तान (IND vs PAK) विरुद्ध होईल. महिला क्रिकेटचा प्रथमच राष्ट्रकूल स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. बार्बाडोसविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही पाकिस्तानचा पराभव झाला होता. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.
असा आहे रेकॉर्ड
रेकॉर्ड्सचा अंदाज घेतला तर, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघ ११ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारताने ९ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानला फक्त दोन विजय मिळाले आहेत. २०१६च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचा भारताविरुद्धचा शेवटचा विजय होता. यामध्ये त्यांनी दोन धावांनी विजय मिळवला होता. २०१२ मध्ये पाकिस्तानने भारताचा एका धावेने पराभव केला होता. शेवटचा सामना २०१८मध्ये झाला होता, जो टीम इंडियाने ७ विकेट्सने जिंकला होता.
भारताला टक्कर मिळणार?
सध्या दोन्ही संघांचा फॉर्म पाहिल्यास हरमनप्रीत कौरच्या भारताविरुद्ध पाकिस्तानला टक्कर देणे सोपे जाणार नाही. त्याच वर्षी भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव केला. मधल्या षटकांमध्ये पाकिस्तानने चांगली गोलंदाजी केली, पण भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांना जास्त काळ वर्चस्व गाजवण्याची संधी दिली नाही. त्यामुळे भारताने हा सामना सहजपणे खिशात घातला होता.
भारताला सुधारणा करावी लागेल
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय गोलंदाजांना मधल्या षटकात दडपण निर्माण करता आले नाही. यामुळेच पॉवरप्लेमध्ये चार विकेट्स घेऊनही भारताला सामना जिंकता आला नाही. संघाच्या फिरकी गोलंदाजांना मधल्या षटकात विकेट्स घ्याव्या लागतील. दुसरीकडे, बार्बाडोससमोर पाकिस्तान संघाला १४५ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. अ गटात भारत तिसऱ्या आणि पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. टेबलमधील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. त्यामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी रविवारी होणाऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यासाठी सज्ज असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अर्शदीपने सांगितले आपल्या यशाचे गमक; ‘त्या’ दोन व्यक्तींबाबत बोलला मन जिंकणारी गोष्ट
स्पष्टपणे आऊट दिसत असतानाही शफालीला का दिले गेले नॉट आउट?
ब्रेकिंग! झिम्बाब्वे विरुद्ध टीम इंडियाची घोषणा, धवन कर्णधार, पण यांची निवड चकित करणारी