क्रिकेट विश्वातून एक आश्चर्यजनक बातमी समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकाच टीमकडून खेळताना दिसू शकतात. आता तुम्ही म्हणाल की, हे दोन संघ एकमेकांविरुद्ध मालिका खेळत नाहीत, तर खेळाडू एका संघाकडून कसे खेळतील? तर हे शक्य आहे.
वास्तविक, आफ्रो-एशिया कपमध्ये भारताचा विराट कोहली आणि पाकिस्तानचा बाबर आझम एका संघाकडून खेळू शकतात. या कपचं पुन्हा एकदा आयोजन होणार असल्याच्या बातम्या वेगानं पसरत आहेत. आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष समोद दामोदर यांनी यासाठी जोर लावला आहे. ही स्पर्धा शेवटची 2007 मध्ये खेळली गेली होती. तेव्हा आशिया एलेव्हन आणि आफ्रिका एलेव्हन यांच्यात लढत झाली होती. आता जर पुन्हा एकदा ही स्पर्धा खेळली गेली, तर विराट आणि बाबर एका टीमकडून खेळताना दिसू शकतात.
समोद दामोदर फोर्ब्स मासिकाशी बोलताना म्हणाले की, “एसीएकडून यासाठी हवा तसा पाठिंबा मिळाला नाही. मात्र यावर विचार केला जात आहे. मला वाटतं की, मुळात हे समजण्याचं गरज होती. आमच्या सदस्यांना आता पश्चाताप होतोय. याला आफ्रिकेकडून अधिक पाठिंबा मिळण्याची आवश्यकता होती.”
येथे नमूद करण्याजोगी बाब म्हणजे, 2022 मध्ये ही स्पर्धा जवळपास पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनमधील अंतर्गत वादांमुळे हिला मूर्त स्वरुप आलं नाही.
दामोदर पुढे बोलताना म्हणाले की, “हा सामना राजकीय बंधनं मोडू शकतो. क्रिकेटचा वापर एकमेकांना जोडण्यासाठी केला जाऊ शकतो. मी व्यक्तगतरित्या मानतो की, खेळाडू एकमेकांचे विरोधक नसतात, त्यामुळे ते यासाठी तयार होतील.”
हेही वाचा –
147 वर्षांचा इतिहास बदलण्यासाठी कोहली सज्ज, लवकरच तुटणार सचिन तेंडुलकरचा हा विक्रम
ट्रॅव्हिस हेडचा पंजाब किंग्जच्या कर्णधारावर हल्लाबोल, एका षटकात कुटल्या 30 धावा; पाहा व्हिडिओ
‘कप’च्या नावावर ‘बाउल’ दिले, मालिका जिंकूनही ऑस्ट्रेलियाचा अपमान? व्हिडिओ व्हायरल





