क्रिकेटटॉप बातम्या

ट्रॅव्हिस हेडचा पंजाब किंग्जच्या कर्णधारावर हल्लाबोल, एका षटकात कुटल्या 30 धावा; पाहा व्हिडिओ

सध्या ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात ट्रॅव्हिस हेड पुन्हा एकदा आक्रमक फॉर्ममध्ये दिसला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमानांचा 28 धावांनी पराभव केला. या विजयाचा हिरो सलामीवीर ट्रॅव्हिस हेड ठरला. त्याने अवघ्या 23 चेंडूत 59 धावा केल्या. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.

या सामन्यादरम्यान ट्रॅव्हिस हेडने विशेषतः इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करनला लक्ष्य केले. सॅम करनने ऑस्ट्रेलियाच्या डावातील 5वी षटक टाकली. या षटकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर हेडने जोरदार चौकार मारला. यानंतर त्याने पुढच्या 3 चेंडूत सलग तीन षटकार ठोकले. तो इथेच थांबला नाही. शेवटच्या चेंडूवर हेडने पुन्हा एकदा बॅट फिरवली आणि चौकार मारण्यात यश मिळविले. अशाप्रकारे हेडने षटकात 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने एकूण 30 धावा केल्या. हेडच्या धोकादायक फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात फिल सॉल्टने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची स्फोटक सुरुवात झाली. हेड आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. हेडने 59 आणि शॉर्टने 41 धावांचे योगदान दिले. यानंतर जोश इंग्लिशनेही 37 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीच्या जोरावर पाहुण्यांनी 19.3 षटकांत सर्व गडी गमावून 179 धावा केल्या.

प्रत्युत्तराच्या डावात इंग्लंडकडून खराब फलंदाजी पाहायला मिळाली. यजमान संघाकडून लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 27 चेंडूत 37 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीसमोर संपूर्ण संघ 19.2 षटकांत 151 धावांत गडगडला आणि कांगारूंनी 28 धावांनी सामना जिंकला.

हेही वाचा-

‘कप’च्या नावावर ‘बाउल’ दिले, मालिका जिंकूनही ऑस्ट्रेलियाचा अपमान? व्हिडिओ व्हायरल
‘हिटमॅनचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास संपणार’, माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी
कांगारुंचा वरचढ! यजमान इंग्लंडचा घरच्या मैदानावर दारुण पराभव

Related Articles