टी20 विश्वचषकात (T20 World Cup) रविवारी (30 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लुंगी एन्गिडीने भारतीय संघाला सुरुवातीला संकटात टाकल्यानंतर सूर्यकुमार यादवने केलेल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळीने भारतीय संघाला 9 बाद 133 पर्यंत पोहोचवले.
Innings Break!@surya_14kumar shines with the bat as #TeamIndia post 133/9 on the board. #T20WorldCup | #INDvSA
Over to our bowlers now. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/KBtNIjPFZ6 pic.twitter.com/DNNQtZfiHu
— BCCI (@BCCI) October 30, 2022
पहिले दोन सामने जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाने अक्षर पटेलच्या जागी दीपक हुडाला संधी दिली. दक्षिण आफ्रिकेने पहिले नऊ चेंडू निर्धाव टाकत चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर रोहित व राहुलने प्रत्येकी एक षटकार मारत धावांचे खाते खोलले. परंतु, पाचव्या षटकात गोलंदाजीला आलेल्या लुंगी एन्गिडीने त्या दोघांना बाद करत भारताला जबर धक्के दिले. त्यानंतर सातव्या षकात विराट कोहलीला 12 धावांवर बाद करत भारतीय संघाला संकटात टाकले.
नॉर्किएने हुडाला 0 व एन्गिडीने हार्दिकला 2 धावांवर बाद करून संघाची अवस्था 5 बाद 49 केली. त्यानंतर मागील सामन्यात अर्धशतक केलेल्या सूर्यकुमार यादवने संघाची जबाबदारी खांद्यावर घेत दिनेश कार्तिकसह 52 धावांची भागीदारी केली. कार्तिक बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने 30 चेंडूंवर आपले सलग दुसरे अर्धशतक साजरे केले. त्याने बाद होण्यापूर्वी भारतासाठी सर्वाधिक 68 धावा केल्या. अखेरच्या तीन शतकात दक्षिण आफ्रिकेने टिच्चून गोलंदाजी करत भारताला 133 धावांवर रोखले. दक्षिण आफ्रिकेसाठी एन्गिडीने सर्वाधिक चार तर, वेन पार्नेलने तीन बळी मिळवले. नॉर्किएने एका गड्याला बाद केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पाकिस्तान सेमीफायलमधून बाहेर झाल्यावर आनंद होईल, पण…’, बीसीसीआय अध्यक्षांचे मोठे वक्तव्य
“जर रिषभ पंत पाकिस्तानात असता, तर वर्ल्डकपमधून कधीच बाहेर बसवलं नसतं”