भारतीय बॅडमिंटन चाहत्यांना शुक्रवारी (१३ मे) आनंदाची बातमी मिळाली. भारतीय पुरुष संघाने थॉमस कपच्या ७३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामन्यात धडक मारली. उपांत्यफेरीत भारताने २०१६ च्या विजेत्या डेन्मार्कला ३-२ अशा फरकाने मात दिली. भारताने यापूर्वी १९७९ साली भारताने उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती. पण त्यापुढे त्यांना जाता आले नव्हते. पण आता, यंदा भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
भारताकडून उपांत्य फेरीत एचएस प्रणॉय (HS Prannoy), किदांबी श्रीकांत (Kidambi Srikanth) आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी (Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty) यांनी विजय मिळवत भारताचा अंतिम सामन्यातील प्रवेळ पक्का केला. आता अंतिम सामन्यात भारतासमोर १४ वेळच्या विजेत्या इंडोनेशियाचे आव्हान असणार आहे. इंडोनेशियाने जपानला उपांत्यफेरीत ३-२ ने पराभूत केले आहे.
MISSION🏅
Dream of a billion plus just came true. Absolute champion stuff from our boys as they became the first ever 🇮🇳team to advance into the 𝙁𝙄𝙉𝘼𝙇S of #ThomasCup
Kudos to entire coaching team & support staffs. Take a bow👏@himantabiswa#ThomasCup2022#IndiaontheRise pic.twitter.com/cGdeFJIZD7
— BAI Media (@BAI_Media) May 13, 2022
भारताने उपांत्यपूर्व सामन्यात ५ वेळच्या विजेत्या मलेशियाला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला (Lakshya Sen) विक्टर ऍक्सेलसन विरुद्ध विजय मिळवता आला नाही. त्याला २१-१३,२१-१३ असा पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे डेन्मार्कला १-० अशी आघाडी मिळाली होती.
पण, पण, सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या भारतीय जोडीने डेन्मार्कच्या किम अस्ट्रुप आणि मॅथियास ख्रिश्चनसेन यांना दुहेरीत २१-१८, २१-२३, २२-२० अशा अटीतटीच्या लढतीत मात दिली आणि १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर किदांबी श्रीकांतने जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अँडर्स अँटोन्सेन याला २१-१८, १२-२१,२१-१५ असे तीन सेटमध्ये पराभूत करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
मात्र, भारताची ही आघाडी अँडर्स स्कारुप रासमुसेन आणि फ्रेडरिक सॉगार्ड या डॅनिश जोडीने भारताच्या कृष्णा प्रसाद गरगा आणि विष्णूवर्धन गौड पंजाला (Krishna Prasad Garaga and Vishnuvardhan Goud Panjala) या जोडीला पराभूत करत कमी केली आणि डेन्मार्कला बरोबरी साधून दिली. अँडर्स स्कारुप रासमुसेन आणि फ्रेडरिक सॉगार्ड यांनी दुहेरीच्या सामन्यात २१-१४, २१-१३ असा विजय मिळवला.
त्यामुळे एचएस प्रणॉयवर सर्वांचेच लक्ष होते. त्याचा सामना निर्णायक ठरणार होता. त्यानेही आपल्यावरील विश्वास कायम ठेवला. विशेष म्हणजे उपांत्य फेरीतील सामना खेळताना त्याला घोट्याची दुखापत झाली होती. पण त्याने या दुखापतीनंतरही त्याने डेन्मार्कच्या रासमुस गेमके याला १३-२१, २१-९, २१-१२ असे पराभूत केले आणि भारताला ३-२ असा विजय मिळवून देत अंतिम सामन्यातील स्थानही पक्के केले. या विजयानंतर भारतीय संघाने जोरदार सेलिब्रेशनही केले.
𝘾𝙚𝙡𝙚𝙗𝙧𝙖𝙩𝙞𝙤𝙣 𝙩𝙤 𝙗𝙖𝙣𝙩𝙖 𝙝𝙖𝙞 🥳🕺
Video courtesy: BWF#TUC022 #ThomasCup2022#Bangkok2022 #IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/DG5drIksBL
— BAI Media (@BAI_Media) May 13, 2022
थॉमस कपमध्ये (Thomas Cup) भारताचा आता अंतिम सामना (Final Round) इंडोनेशियाविरुद्ध १५ मे रोजी रविवारी होणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
बेंगलोर-पंजाब सामन्याला मांजरीनेही लावली हजेरी; सामना थांबवत दोन्ही संघांच्या कर्णधारांनी घेतली मजा
आजच्याच दिवशी क्रिकेटचा महामेरु सचिनचे झाले होते आयपीएल पदार्पण, ‘अशी’ राहिली त्याची कारकिर्द
‘मी आणखी करू तरी काय?’, अवघ्या २० धावांवर तंबूत परतताना विराटची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद; चाहतेही दु:खी