मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी (2 नोव्हेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका असा सामना खेळला गेला. स्पर्धेतील या 33 व्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला अजिबात संघर्ष करण्याची संधी दिली नाही. फलंदाजांनी 357 धावा उभ्या केल्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव अवघ्या 55 धावांवर गुंडाळत 302 धावांनी विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला.
https://www.instagram.com/reel/CzJgPVnsQMH/?igshid=MzRlODBiNWFlZA==
आपल्या सलग सातव्या सामन्यात विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी यावे लागले. मात्र पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केल्यानंतर रोहित शर्मा दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी विराट व गिल यांनी 189 धावांची मोठी भागीदारी रचली. मात्र, ते दोघेही शतक झळकावण्यापासून वंचित राहिले. विराटने 88 तर गिल याने 92 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यर यांनी स्पर्धेतील आत्तापर्यंतचे आपले अपयश धुवून काढत 56 चेंडूवर 82 धावांची वादळी खेळी केली. अखेरीस रवींद्र जडेजाने काही मोठे फटके खेळत भारताला 357 पर्यंत मजल मारून दिली. श्रीलंका संघासाठी दिलशान मधुशंका याने सर्वाधिक पाच बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना जसप्रीत बुमराह याने भारताला पहिल्या चेंडूवर यश मिळवून दिले. त्यानंतर सिराज याने दुसऱ्या षटकात दोन बळी मिळवले. त्यानंतर गोलंदाजीला आलेल्या मोहम्मद शमी याने श्रीलंकेच्या फलंदाजांना प्रतिकाराची संधी न देता पाच बळी आपल्या नावे केले. अखेरचा बळी जडेजा याने टिपला. शमीला या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले.
(India Registerd 302 Runs Win Over Srilanka In ODI World Cup Indian Pacers Shines)
महत्वाच्या बातम्या –
जस्सी जैसा कोई नही! पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेला दिला दणका
श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाने आणली धावांची त्सुनामी! विराट-गिलनंतर श्रेयस-जड्डूचा धमाका