बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेला एक कसोटी सामना हा दिवस-रात्र घेण्याला भारताने नकार दिला आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 6-10 डिसेंबरदरम्यान अॅडलेड स्टेडियमवर होणारा आहे. हा सामना दिवस-रात्र खेळवण्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा विचार आहे.
याआधी ऑस्ट्रेलियाची दिवस-रात्र कसोटी सामन्याची संकल्पना न्युझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या देशांसोबत यशस्वी ठरली आहे.
या संकल्पनेने क्रिकेटचे भवितव्य आणि त्याबाबत असलेल्या प्रेक्षकांची संख्या तसेच टिव्हीवरील रेटिग्ज वाढण्यास मदत होईल असे क्रिकेट आॅस्ट्रेलियाला वाटते.
मात्र बीसीसीआयचा याला विरोध आहे. यासंबंधी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड म्हणाले ते बीसीसीआय बरोबर दिवस-रात्र कसोटीसाठी वाटाघाटी करत आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया श्रीलंकेविरूध्द गुलाबी चेडूंचा कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना पुढच्या वर्षी जानेवारी 24-28 ब्रिसबेनमध्ये खेळवला जाणार आहे.
” भारताने अॅडलेड येथे होणारा दिवस-रात्रचा कसोटी सामना खेळावा याला आमचे प्राधान्य आहे,पण यावर अजून विचार सुरू आहे आणि येत्या काही आठवड्यात त्याचे उत्तर येईल”, असे ते म्हणाले.
आयसीसीच्या येत्या कसोटी चॅम्पियनशीपमध्ये दिवस-रात्र कसोटी सामने खेळवावेत याबद्दल सदरलँड यांचे कसोशीने प्रयत्न करत आहे, मात्र बीसीसीआयचा याला मोठा विरोध आहे.
भारताच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला टी-20 मालिकेने सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनच्या गॅबा स्टेडियमवर 21 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे