---Advertisement---

INDvPAK: टीम इंडियाचा जोरदार कमबॅक! भेदक गोलंदाजीने पाकिस्तान 191 वर गारद

---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना शनिवारी (14 ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला गेला. पाकिस्तनने नाणेफेक गमावल्यानंतर त्यांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर पाकिस्तानसाठी कर्णधार बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी शानदार भागीदारी करत डाव सावरला होता. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानचा डाव केवळ 191 धावांवर संपवला. भारतीय संघासाठी सर्व गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत बळी मिळवले.

https://twitter.com/ICC/status/1713164428244615451?t=oxhiXBlBE7bAeHPAQEPHJw&s=19

प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर पाकिस्तानला इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफीक यांनी आठ षटकात 41 धावांची सलामी दिली. शफीकला सिराजने बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. इमाम उल हक याने 36 धावांचे योगदान दिले. त्यानंतर कर्णधार बाबर आझम व मोहम्मद रिजवान यांनी 78 धावांची भागीदारी केली. बाबर भारताविरुद्ध आपले पहिले अर्धशतक करून बाद झाला. बाबर बाद झाला तेव्हा पाकिस्तानची अवस्था तीन बाद 155 अशी होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आपला फास आवळला आणि पाकिस्तानला 191 धावांवर सर्वबाद केले.

भारतीय संघासाठी सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. बुमराह, सिराज, हार्दिक, कुलदीप व जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

(India Restricted Pakistan On 191 In ODI World Cup Bumrah Siraj Kuldeep Shines)

महत्वाच्या बातम्या – 
कुलदीपच्या एकाच ओव्हरमध्ये पाकिस्तानचा खेळ खल्लास! दोन धडाकेबाज फलंदाज तंबूत
भारताविरुद्ध पहिले अर्धशतक साकारताच तंबूत परतला बाबर, सिराजने केला सुपडा साफ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---