टीम इंडियाने जरी आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याचा सपाटा लावला असला तरीही भारताचे काही स्टार खेळाडू गेले कित्येक महिने संघाबाहेर आहेत. यामुळे गेल्या अनेक मालिकांत संघाला आपली तगडी ११ खेळाडूंची टीम कधीच मैदानात उतरवता आली नाही. काही खेळाडू दुखापतीमधून सावरत आहेत तर काही खेळाडूंना अजून दुखापतीमधून सावरायला वेळ लागणार आहे.
पृथ्वी शाॅने मात्र दुखापतीतून सावरत संघात स्थान मिळवले आहे. मधल्या काळात त्यावर बंदी देखील होती. सध्या संघाबाहेर असलेल्या अशाच खेळाडूंच्या सध्याच्या दुखापतीचा आढावा घेणारा हा लेख-
हार्दिक पंड्या-
भारताचा हा स्टार अष्टपैलू खेळाडू सप्टेंबर २०१९पासून कोणताही आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत क्रिकेटमधील सामना खेळलेला नाही. त्याने शेवटचा सामना २२ सप्टेंबर २०१९ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बेंगलोर येथे खेळला होता.
पंड्या हा पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता तसेच त्याने यावर गेल्यावर्षी शस्त्रक्रीयाही केली आहे. गेल्या महिन्यापासून पंड्याने सरावाला सुरुवात केली आहे. परंतु तो अजूनही आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी फिट नाही. न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या इंडिया अ संघात त्याची निवड झाली होती. परंतु ऐनवेळी त्याने गोलंदाजीसाठी फिट नसल्यामुळे त्यातून माघार घेतली.
पंड्याने जानेवरी महिन्याच्या पहिल्याच महिन्यात आपल्या वैयक्तिक जिवनाबद्दल एक पोस्ट केली असून तो एंगेज्ड झाला आहे.
भुवनेश्वर कुमार-
भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यातील महत्त्वाचे नाव अर्थात भुवनेश्वर कुमार. २०१३मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या भुवीने ११ डिसेंबर २०१९ रोजी वेस्ट इंडिज संघाविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. परंतु टी२० मालिकेनंतर होणाऱ्या वनडे मालिकेतून तो sports herniaमुळे बाहेर पडला.
या महिन्याच्या सुरुवातीलाचा त्याच्यावर लंडन येथे शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. लंडनहुन परतल्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करणार आहे. त्याच्या टीम इंडियात परतण्याबद्दल बीसीसीआय कोणतीही घाई करणार नाही. भुवी ५ फेब्रुवारी २०२० रोजी आपला ३०वा वाढदिवस साजरा करणार आहे.
इशांत शर्मा-
सध्याच्या भारतीय कसोटी संघातील सर्वात सिनीयर खेळाडू अशी ओळख असलेला २४ नोव्हेंबर २०१९पासून भारतीय संघातून बाहेर आहे. फक्त कसोटी संघात स्थान मिळत असलेल्या या दिग्गज खेळाडूने भारताकडून २००७पासून ९६ कसोटी सामने खेळले आहे. ज्यात त्याने २९२ विकेट्स घेतल्या आहेत.
इशांतची न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड होणे जवळपास निश्चित होते. परंतु दिल्ली विरुद्ध विदर्भ रणजी सामन्यात त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला ६ आठवडे विश्रांती करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संघाचा सदस्य नसणार आहे.
शिखर धवन-
शिखर धवनसाठी पाठीमागचा काही काळ हा अतिशय खराब राहिला. त्याचा चांगलाच फाॅर्म हरवला होता. परंतु पुन्हा चांगली कामगिरी करायला सुरुवात केल्यानंतर हा खेळाडू पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे. विश्वचषकानंतर हा ३४ वर्षीय खेळाडू अनेक सामन्यांत दिसलाच नाही. विश्वचषकात बोटांना झालेल्या दुखापतीमुळे हा खेळाडू संघाबाहेर गेला. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो संघाबाहेर राहिला तर सध्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे तो संघाचा भाग नाही. तो लवकरच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव सुरु करणार आहे.
शिखर धवनच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी मुंबईकर पृथ्वी शाॅची संघात निवड झाली असुून सध्या सुरु असलेल्या टी२० मालिकेत संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. परंतु रोहितबरोबर सलामीला मात्र कर्णधार कोहलीने केएल राहुललाच संधी दिली आहे. आणि त्यानेही या संधीचे सोने केले आहे. जर वनडेत पृथ्वी शाॅने संधी मिळाल्यावर चांगली कामगिरी केली तर मात्र शिखरचे परतने जवळपास अवघड आहे.
सामना जिंकून देणाऱ्या रोहित शर्माच्या त्या २ षटकारांचा काहीच उपयोग नाहीhttps://t.co/sGYdmuYJTP#म #मराठी #Cricket #NZvIND #TeamIndia #SuperOver
— Maha Sports (@Maha_Sports) January 29, 2020
भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय; अशी रंगली सुपर ओव्हर
वाचा????https://t.co/vyCccVvia9????#म #मराठी #Cricket #NZvIND #TeamIndia #SuperOver— Maha Sports (@Maha_Sports) January 29, 2020
अखेर कर्णधार कोहली ठरला नंबर वन; 'कॅप्टनकूल' धोनीचा विक्रम मोडलाच!!
वाचा????https://t.co/7KSn1Is8im????#म #मराठी #Cricket #NZvIND #TeamIndia @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 29, 2020






