भारतीय क्रिकेट संघाने काल ३०४ धावांच्या फरकाने श्रीलंका संघावर सर्वात मोठा विजय मिळवला. हा भारताचा परदेशी भूमीवर सर्वात मोठा कसोटी विजय होता.
दुसरा मोठा विजय
यापूर्वी भारताने कपिल देवच्या नेतृत्वाखाली १९८६ साली इंग्लंडविरुद्ध लीड्सवर २७९ धावांनी विजय मिळवला होता. दिलीप वेंगसकर त्यावेळी सामनावीर ठरले होते.
तिसरा मोठा विजय
२०१५ साली श्रीलंकेविरुद्धच भारताने २७८ धावांनी विजय मिळवला होता. विशेष म्हणजे भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीच तेव्हाही भारतीय संघाचा कर्णधार होता. पहिल्या कसोटी सामन्यात तापामुळे न खेळलेला केएल राहुल त्यावेळी समानवीर ठरला होता.
चौथा मोठा विजय
मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्युझीलँडमध्ये २७२ धावांनी विजय मिळवला होता.
पाचवा मोठा विजय
भारताचा परदेशी भूमीवरील पाचवा मोठा विजय हा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २०१६ साली वेस्ट इंडिजमध्ये झाला. या सामन्यात आर अश्विन सामनावीर ठरला होता.
भारताच्या पाच मोठ्या कसोटी विजयात कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ३ झाले आहेत.