---Advertisement---

IND vs NZ: श्रेयस अय्यरचे शानदार अर्धशतक! भारताचे न्यूझीलंडसमोर 250 धावांचे आव्हान

On: रविवार, मार्च 2, 2025 6:05 PM
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील 12व्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने आहेत. दरम्यान दोन्ही संघातील हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 250 धावांचे आव्हान ठेवले आहे.

न्यूझीलंड कर्णधार मिचेल सँटनरने टाॅस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. दरम्यान भारतीय संघ 249 धावा करण्यात यशस्वी ठरला. भारताने 9 गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या गाठली. भारतासाठी श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सर्वाधिक 79 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 4 चौकारांसह 2 षटकार ठोकले. त्यानंतर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) 45 धावा, अक्षर पटेल (Axer Patel) 42 धावा यांच्या जोरावर भारतीय संघाने 249 धावा केल्या.

या सामन्यात भारतीय संघाची सलामी जोडी खास सुरूवात करण्यात अपयशी ठरली. भारताने अवघ्या 15 धावसंख्येवर आपली पहिली विकेट शुबमन गिलच्या रूपात गमावली. त्यानंतर दिग्गज रोहित शर्मा आणि आणि विराट कोहली लगेचच तंबूत परतले. रोहित आणि कोहली अनुक्रमे 15 आणि 11 धावसंख्येवर बाद झाले.

त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने भारतीय संघाचा डाव सावरला, अक्षर पटेलने 42 धावांची उत्कृष्ट खेळी केली, तर श्रेयर अय्यरने शानदार अर्धशतक (79 धावा) झळकावले. त्यानंतर केएल राहुलने 23 धावा आणि हार्दिक पांड्याने 45 धावांची खेळी केली. शेवटी रवींद्र जडेजा 16 धावा करण्यात यशस्वी ठरला.

न्यूझीलंडसाठी वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने (Matt Henry) पंजा उघडला. त्याने आपल्या 8 षटकांमध्ये भारतीय संघाचे 5 फलंदाज तंबूत धाडले. त्यानंतर कायल जेमीसन, विल्यम ओर्रुर्के, कर्णधार मिचेल सँटनर आणि रचिन रवींद्र आणि प्रत्येकी 1-1 विकेट्स आपल्या नावावर केली.

आता न्यूझीलंड संघ भारताने दिलेल्या 250 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात यशस्वी होतो का? हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

अरेरे! 50 वर्षांच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात नकोसा विक्रम रोहितच्या नावावर
अनुष्काची ‘ती’ प्रतिक्रिया चर्चेत, विराटच्या विकेटनंतर काय घडलं?
“क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता! भारताचा सेमीफायनलचा प्रतिस्पर्धी कोण?”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---