भारत आणि इंग्लंड संघादरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर पूर्णपणे दबाव बनवलेला आहे. भारतीय गोलंदाजांसाठी हा सामना अतिशय कठीण ठरला. इंग्लंडने पहिल्या डावात तब्बल 578 धावांचा डोंगर उभा केला. चेन्नईच्या उष्ट वातावरणात भारतीय गोलंदाजांना तब्बल 190.1 षटके गोलंदाजी करावी लागली.
यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तब्बल 36 षटके गोलंदाजी केली. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की बुमराह मागील बऱ्याच कालावधीपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. बुमराहच्या सातत्याने क्रिकेट खेळण्यासंदर्भात गौतम गंभीरची प्रतिक्रिया समोर येत असून, त्याच्या मते भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला आराम देवू शकतो.
“बुमराहला आराम देण्याची गरज”
एका कार्यक्रमादम्यान गंभीर म्हणाला, “मला नाही वाटत की दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहची निवड होईल. माझ्या मते भारताने त्याला गुलाबी चेंडूने होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी राखून ठेवले पाहिजे. बुमराह या मालिकेत एक्स फॅक्टर खेळाडू ठरणार आहे.”
बुमराहला अधिक गोलंदाजी देण्याबाबत देखील गंभीर काहीसा असहमत दिसला. गंभीर म्हणाला,”बुमराह कडून सलग जास्त षटके गोलंदाजी करवून घेणे चुकीचे आहे. त्याला केवळ तीन षटके गोलंदाजी करण्यासाठी बोलवावे व विकेट घेण्याचा प्रयत्न करावा. कारण बुमराह या मालिकेत फार महत्वाची भूमिका बजावणार आहे.”
दरम्यान सामन्याचा विचार केला असता तिसरा दिवस देखील इंग्लडच्या बाजूने झुकला. दिवसअखेर भारताने आपल्या डावात 6 गडी गमावत 257 धावा केलेल्या आहेत. भारताकडून केवळ रिषभ पंत व चेतेश्वर पुजारा यांनी काहीसा संघर्ष केला. पंतने आक्रमक 91 तर पुजाराने 73 धावांची खेळी केली. भारतीय संघ इंग्लंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून अजूनही 321 धावांनी पिछाडीवर आहे. भारताला पराभव टाळण्यासाठी सामन्याच्या चौथ्या दिवशी अविश्वसनीय कामगिरी करावी लागेल.
महत्वाच्या बातम्या:
दुर्दैवी! वेस्टइंडीजच्या महिला संघाला विश्वविजेता बनवणाऱ्या माजी गोलंदाजाचे कारच्या धडकेने निधन
BAN vs WI : पदार्पणवीर कायले मेयर्सचे अद्भुत द्विशतक, वेस्ट इंडिजचा बांगलादेशवर संस्मरणीय विजय
शतक आणि पंतच थोडसं वाकडचं! आजवर चक्क चार वेळा झालाय ९०-९९ धावांवर बाद