---Advertisement---

रिषभ पंतने ५ षटकार ठोकत एमएस धोनीच्या ‘या’ मोठ्या विक्रमाची केली बरोबरी

On: रविवार, फेब्रुवारी 7, 2021 6:30 PM
---Advertisement---

चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात ७४ षटकात ६ बाद २५७ धावा केल्या आहे. भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने यावेळी धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. याबरोबरच त्याने एक खास विक्रमही केला आहे.

भारताची आवस्था पहिल्या डावात ४ बाद ७३ धावा अशी असताना पंत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने चेतेश्वर पुजारासह शतकी भागीदारी करताना तुफानी खेळ केला. त्याने ८८ चेंडूंचा सामना करताना ९ चौकार आणि ५ षटकारांसह ९१ धावांची खेळी केली.

धोनीची केली बरोबरी –

पंतने भारताच्या पहिल्या डावात ५ षटकार मारताच धोनीच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. तो भारताकडून कसोटी सामन्याच्या एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक षटकर मारणारा धोनीनंतरचा दुसराच यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. धोनीने त्याच्या कारकिर्दीत ४ वेळा एका कसोटी डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले आहे.

एका कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय यष्टीरक्षक फलंदाज –
६ – एमएस धोनी (विरुद्ध वेस्ट इंडिज, अँटिग्वा, २००६)
६ – एमएस धोनी (विरुद्ध श्रीलंका, मुंबई, २००९)
६ – एमएस धोनी (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई, २०१३)
५- एमएस धोनी (विरुद्ध वेस्ट इंडिज, कोलकाता, २०११)
५ – रिषभ पंत (विरुद्ध इंग्लंड, चेन्नई, २०२१)

इंग्लंडविरुद्ध एका कसोटी डावात ५ षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज –

इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यामध्ये एका कसोटी डावात ५ षटकार मारणारा रिषभ पंत पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी इंग्लंडविरुद्ध असा विक्रम कोणाला करता आला नव्हता. त्याच्याआधी कपिल देव, विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, मुरली विजय आणि करुण नायर यांनी इंग्लंडविरुद्ध कसोटीत एका डावात ४ षटकार मारले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहला खेळवू नये, माजी खेळाडूची मागणी

“हे क्षेत्ररक्षणाला गांभीर्याने घेत नाहीत”, माजी भारतीय खेळाडूने व्यक्त केला संताप

दुर्दैवी! वेस्टइंडीजच्या महिला संघाला विश्वविजेता बनवणाऱ्या माजी गोलंदाजाचे कारच्या धडकेने निधन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---