भारताची अव्वल महिला धावपटू द्युती चंद हिने शुक्रवारी (2 डिसेंबर) भारतीय क्रीडाविश्वातील एक क्रांतिकारी निर्णय घेतला. ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या द्युतीने आपली समलैंगिक साथीदार मोनालीसा हिच्याशी लग्नगाठ बांधली. समलैंगिक संबंध स्विकारून विवाह करणारी द्युती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
द्युतीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर आपल्या साथीदारांसोबतची छायाचित्रे पोस्ट करत लिहिले,
‘मी तुझ्यावर आधीही प्रेम करत होते आणि आताही करत राहिल.’
“Loved you yesterday, love you still, always have, always will.” pic.twitter.com/1q3HRlEAmG
— Dr Dutee Chand Olympian (@DuteeChand) December 2, 2022
द्युतीने तीन वर्षांपूर्वीच आपण समलैंगिक असल्याचा खुलासा केला होता. मात्र, तिने आपल्या साथीदाराचे नाव उघड करण्यास नकार दिला होता. केवळ ती आपल्या नाते संबंधातील असल्याचे तीने स्पष्ट केलेले. त्यानंतर आता लग्न केले आहे. विदेशातील अनेक खेळाडू समलैंगिक असल्याचे स्विकारत विवाह करत असतात. मात्र, भारताच्या क्रीडा इतिहासात असा निर्णय घेणारी द्युती पहिली क्रीडापटू आहे.
भारताची महान धावपटू पीटी उषा हिची शिष्य असलेली द्युती सध्या भारताच्या सर्वात वेगवान महिला धावपटूंपैकी एक आहे. 2014 मध्ये तिच्यावर पुरूष असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र, हार्मोन्सच्या असंतुलनामूळे तिच्यात काहीशी जास्त ताकद असल्याचे नंतर समोर आलेले. 100 मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या द्युतीने आशियाई खेळांमध्ये दोन रौप्य पदके आपल्या नावे केली आहेत.
(India Sprinter Dutee Chand Announces Marriage With lesbian Partner)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023च्या हंगामासाठी नवा नियम, सामन्यात एका संघाचे 11 नाहीतर 15 खेळाडू होणार सहभागी
नेमका तो गोल होता की नाही? जपानच्या ‘त्या’ वादग्रस्त गोलमुळे जर्मनी स्पर्धेबाहेर